व्यावसायिक असो किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी, हल्ली प्रत्येकालाच आपल्या दिवसाचं प्लॅिनग करावं लागतं. मीटिंग्सच्या किंवा महत्त्वाच्या कामांच्या नोंदी ठेवाव्या लागतात, रिमाइंडर्स लावावे लागतात किंवा व्याख्यानांमध्ये टिपणं अर्थात नोट्स घ्याव्या लागतात. आता वहय़ा-कागदांऐवजी, या सगळ्या नोंदी तुम्ही तुमच्या मोबाइल-टॅब किंवा कॉम्प्युटरवरच्या डिजिटल टिपणवहय़ांमध्ये करून त्या स्टोअर करू शकता. त्याविषयी जाणून घेऊयात-
ATnotes
मोबाइलप्रमाणेच कॉम्प्युटरवर तुम्हाला नोट्स तयार करायच्या असतील तर ATnotes हे फ्रीवेअर उपयुक्त आहे. ४६ भाषांमध्ये उपलब्ध असलेलं हे फ्रीवेअर atnotes.free.fr/index.html येथे उपलब्ध आहे. ७०० ते ८०० केबी असलेले हे फ्रीवेअर वापरण्यास आणि हाताळण्यास अत्यंत सोपे आहे.
यात तुम्हाला एखादे काम विशिष्ट वेळेत करायचे असल्यास तुम्ही नोट्समध्ये अलार्म लावू शकता. तसेच तुम्हाला हव्या त्या फॉन्टमध्ये, हव्या त्या रंगामध्ये या नोट्स तयार करू शकतात. त्या नोट्सला ट्रान्स्परन्सीही देता येते. तुमच्या नोंदी तुम्हाला कोणाला दाखवायच्या नसतील तर त्या लपवूनही ठेवता येतात. तुमच्या डेस्कटॉपवर भरपूर नोट्स असल्या, तर त्या चटकन समजाव्यात यासाठी त्या नोट्सची फक्त हेिडग्ज दिसतील अशा प्रकारेही सेटिंग करता येते. तुम्ही तयार केलेल्या नोट्सचे तारखांनुसार फोल्डर होऊन त्या सेव्ह होतात.
या फ्रीवेअरमध्ये नेहमी लागणाऱ्या किंवा बघायच्या असलेल्या संकेतस्थळांच्या िलक्स तुम्ही कॉपी करून नोट करून ठेवल्यास दरवेळी केवळ त्या िलकवर राइट क्लिक करून 'ओपन' असा पर्याय निवडून तुम्हाला चटकन त्या संकेतस्थळावर जाता येते. त्यासाठी ती िलक कॉपी-पेस्ट करण्याची गरज भासत नाही. तुम्ही तयार केलेल्या नोट्स नेटवर्कमध्ये तुम्हाला सहकाऱ्याला किंवा इतर कोणालाही (विन्डोज वापरत असलेल्या) आयपीअॅड्रेजमार्फत पाठवू शकता. त्यासाठी ATnotes send to हा पर्याय यात देण्यात आलेला आहे.

Evernote
अशा डिजिटल टिपणवहय़ांमध्ये Evernote हे अॅप प्रसिद्ध आहे. आजवर अनेक यूजर्स ते वापरत असून वेळोवेळी या अॅप्समध्ये अनेक अपडेट्स केले असल्याने ते अधिक यूजर-फ्रेंडली झाले आहे. यामध्ये तुम्ही फोटो, व्हॉइसने किंवा लिखित स्वरूपात नोट तयार करून ती अपलोड करू शकता, जेणेकरून ती स्टोअर म्हणजेच संग्रहित केली जाईल. या नोट्स तुमच्या मोबाइलमधल्या इतर अॅप्सशीही संलग्न करण्याची सुविधा उपलब्ध आहे. उदा. तुमच्या होम स्क्रीनवर यातली एखादी नोट टाकायची असल्यास तुम्ही ती व्हॉइस कमांडने टाकू शकता.
विशेष म्हणजे, Evernote मध्ये तुम्ही तुमच्या नोट्समध्ये एखादा शब्द शोधू शकता, तो टॅग करू शकता किंवा या नोट्स सोशल नेटवìकग साइट्सवरती सहकाऱ्यांशी किंवा मित्रमत्रिणींशी शेअर करू शकता. उदा. एखाद्या लेक्चर किंवा मीटिंगबाबत तुमच्या सहकाऱ्यांना तुम्हाला रिमाइंडर द्यायचा असेल तर ती नोट तुम्हाला त्याच्याशी शेअर करता येते. बरेचदा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी जाण्याची वेळ येते. अशा वेळी तिथल्या तिथे कागदपत्रे, पावत्या स्कॅन करून या अॅपमध्ये स्टोअर करता येतात. यात तुम्हाला पीडीएफ वाचण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय खवय्यांसाठी Evernote Food हे अत्यंत अफलातून अॅप आहे. त्यात तुम्ही चाखलेल्या पदार्थाचे फोटो काढून सेव्ह करू शकता, तसेच त्याबाबतच्या नोंदीही करू शकता.

Google Keep
गुगलच्या Google Keep या अॅपमध्ये तुम्ही तुमच्या नोट्स, तसेच टु-डु-लिस्ट, फोटो, करायची कामे इत्यादी गोष्टी सेव्ह करू शकता. अर्थातच ही सगळी माहिती तुमच्या जीमेलला किंवा ड्राइव्ह अकाऊंटला जोडली जाते. त्यामुळे तुम्हाला ती कुठूनही व केव्हाही अॅक्सेस करता येऊ शकते. यात तुम्ही नोंदींची रंगानुसार विभागणी करू शकता. उदा. कामाच्या नोट्ससाठी वेगळा रंग, अभ्यासासाठी वेगळा इ. विशेष म्हणजे यातल्या एखाद्या नोटचे चेकलिस्टमध्येही रूपांतर करून त्यातल्या केलेल्या कामांवर खूण करता येऊ शकते. यातही आवाज रेकॉर्ड करून, फोटो वापरून नोंदी करता येऊ शकतात.

0 comments:
Post a Comment