Monday, 16 March 2015

शिक्षण व्यावसायिक कौशल्यांचे


शिक्षण व्यावसायिक कौशल्यांचे

कांचन गोगटे

देशातील व्यवस्थापनशास्त्र शिक्षणातून उद्योगजताला उपयुक्त ठरतील असे मनुष्यबळ आणि भावी नेते (बिझिनेस लीडर्स) मिळणार आहेत. त्या दृष्टीने आपल्याकडील शिक्षणक्षेत्र प्रयत्नशीलही आहे.

मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जॉब्स मिळतील, त्यांचे भविष्यही उज्ज्वल असेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यावसायिक कौशल्यांना धार लावण्याची गरज आहे, असे व्यवस्थापन क्षेत्रातल्या तज्ज्ञांना वाटते. तसे बघितले तर दरम्यान अनेक करिअर्स आणि व्यवस्थापनशास्त्रातल्या शिक्षणाचे पर्याय फायदेशी आहे; पण तरीही भारतात मशरुमसारखी उघडलेले बी-स्कूल्स आपला दर्जा टिकवण्याचा आणि आधुनिक काळातले बदल स्वीकारण्याचा एकसारखे प्रयत्न करतात. एमबीए करु इच्छिणारे विद्यार्थीही चांगल्या बिझिनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत मॅनेजमेण्ट स्कूल्सची जबाबदारी वाढली आहे. कारण या बी-स्कूल्सवरच भविष्यातले समर्थ आणि कार्यकुशल मॅनेजर घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे; तसेच विद्यार्थ्यांना केवळ चांगल्या बी-स्कूलमध्ये अॅडमिशन मिळाले तरी त्यांना जॉब मार्केटमध्ये रेड कार्पेट मिळेल, असे मात्र नाही, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. कारण चांगल्या इन्स्टिट्युटमध्ये अॅडमिशन मिळवण्याबरोबरच त्यांनी स्वतःमधील व्यावसायिक कौशल्येही विकसित करणे अनिवार्य आहे. मॅनेजमेंट हे केवळ शिक्षण घेण्यापुरते मर्यादित नसून ते तुमचा स्वभाव आणि दृष्टीकोन बनायला हवे, असेही तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आज असे मॅनेजर्स हवे आहेत, जे आपत्ती व्यवस्थापन करु शकतील आणि नवनवे ट्रेण्ड्सही निर्माण करु शकतील. आव्हानात्मक परिस्थितीतही मार्ग काढून पुढे जाणाऱ्या बिझिनेस लिडर्सला जगभरात मागणी आहे.

तंत्रज्ञान आणि जागतिकिकरणामुळे मॅनेजर्सचा रोल खूप वाढलेला आहे. पर्यायाने मॅनेजमेंट एज्युकेशनची भूमिकाही विस्तारलेली असून भविष्यातल्या आव्हानांना तोडं देण्यासाठी तयारी करण्यात येत आहे; परंतु भारतात नवनवीन ट्रेण्ड्स आणून मॅनेजमेण्ट एज्युकेशनमध्ये सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे.

तज्ज्ञांच्या मते, मॅनेजमेंट हा अॅटिट्यूड म्हणजे स्वभाव आहे. शिक्षणाच्या मध्यमातून हा स्वभाव विकसित करून त्याचा जीवनात वापर करणारे विद्यार्थी फार पुढे जातात. म्हणूनच चांगली बिझिनेस स्कूल्स ही विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही गोष्टीचा विचार आणि विश्लेषण करण्याची क्षमता वाढण्याचे काम करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅनेजमेण्ट इन्स्टिट्युट्सनी इंडस्ट्रीसाठी चांगले मॅनेजर्स तयार करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, अशी अपेक्षाही तज्ज्ञ व्यक्त करतात.

आजघडीला उद्योग जगताचं भविष्य ठरवणारे अनेक घटक आहेत; परंतु येथे काही प्रश्नही आहेत. एमबीएचे विद्यार्थी खरेच सध्याच्या नव्या परिस्थितीत कमी आणि वेगवेगळ्या साधनसंपत्तीत काम करु शकतात का? तसेच त्यांच्यात तो दृष्टिकोन निर्माण होऊन ते अर्थपूर्ण आणि दीर्घकालिन उपाययोजना करु शकतात का?

सध्या नव्या प्रकारे डिझाइन केलेल्या आणि शिकवल्याही जाणाऱ्या मॅनेजमेंट एज्युकेशनची गरज आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या मॅनेजमेण्ट प्रोग्रामची आवश्यकता आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी ब्रॅण्डचे नाव आणि भूतकाळातील प्लेसमेंट रेकॉर्ड या निकषावर इन्स्टिट्युटची निवड करू नये. इनोव्हेशन, क्रिएटीव्ह थिकिंग, एंथोग्राफी, डिजिटल इकॉनॉमीची समज आणि तिच्या वाढीतले बदल, नेतृत्व, पर्यावरणाशी संबधित कार्यक्रम, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लोकांशी जोडले जाण्यास आणि सामाजिक बदल समजून घेण्यास पात्र बनण्याची विद्यार्थ्यांना बिझिनेस स्कूलकडून मिळणारी संधी, आदी बाबी बघूनच इन्स्टिट्युटची निवड केली पाहिजे.

बिझिनेस स्कूलनीसुद्धा विद्यार्थ्यांची ज्ञानात्मक आणि गणितीय पात्रता वाढवली पाहिजे. सर्जनशीलता, प्रतिकूल परिस्थितीत आणि अनिश्चिततेच्या वातावरणात काम करण्याची पात्रता वाढून विद्यार्थ्यांच्या अन्य कौशल्यांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. अशा सर्व बाबींचा विचार करुनच विद्यार्थ्यांनी बी-स्कूलची निवड केली पाहिजे. अशा बी स्कूलमध्ये प्रवेश घेतला पाहिजे जे स्कूल त्यांना भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यास समर्थ बनवेल.

सध्या कुठल्यातरी एका करिअरची निवड करावीच लागते. त्यापैकी एमबीएला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र टेस्टची तयारी करणे फार महत्त्वाचे आहे. आज राष्ट्रीय पातळीवर केवळ तीनच नॉन-इन्स्टिट्युशनल टेस्ट होतात. विद्यार्थ्यांना एटीएमए सारख्या टेस्ट देण्याचा पर्याय उपलब्ध असून ५५० बिझिनेस स्कूलमध्ये प्रवेश घेण्याची संधी आहे. या परीक्षेच्या एमबीए आणि पीजडीम इन्स्टिट्युट्स एवढ्या मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. ज्यांना अमर्याद पर्याय हवेत आणि राष्ट्रीय पातळीवर असंख्य इन्स्टिट्युट्सही हव्या आहेत, त्यांच्यासाठी या परीक्षा म्हणजे 'ट्रम्प कार्ड'च आहेत. एमबीए/पीजीडीएम स्कूलमध्ये जर अॅडमिशन मिळाले तर तुम्ही आकाशात भरारी घेऊ शकता;

तसेच चांगली एमबीए स्कूल्स हे जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करुन उच्च मूल्य असलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात आणि मूलभूत मापदंड निर्धारीत करुन प्रवेशपूर्व परीक्षेत स्कोअर करतात.

प्रतिष्ठित बी स्कूलची मॅने​जमेंट डिग्रीकडे कॉर्पोरेट जगताचा पासपोर्ट म्हणूनच बघितले जाते, हे मात्र खरे!

Related Posts:

  • The Power of Positive Thinking The Power of Positive Thinking Positive thinking is a mental attitude that admits into the mind thoughts, words and images that are conductive to growth, expansion and success. It is a mental attitude that … Read More
  • Happiness Is Homemade Happiness Is Homemade Regardless of whether we live in the US, India or anywhere else, family is the building block of any society, and our greatest fulfillment lies there. Of course, one needs to give due … Read More
  • असफलता सफलता से कहीं ज़्यादा महत्वपूर्ण है असफलता सफलता से कहीं ज़्यादा महत्वपूर्ण है सभी के जीवन में एक समय ऐसा आता है जब सभी चीज़ें आपके विरोध में हो रहीं हों | चाहें आप एक प्रोग्रामर हैं या कुछ और, आप जीवन के उस मोड़ पर खड़े होता हैं जहाँ सब कुछ ग़लत हो रहा होता… Read More
  • Wonderful Life Wonderful Life Realize that you are magnificence in human form and that your potential is unlimited. You truly are unique and there is no one in the universe with the exact same experiences and perspectives… Read More
  • Its Time to Quit Smoking Its Time to Quit Smoking "I am going to quit smoking tomorrow..." How many times have you said this and how many more times have you heard it? Smokers, like alcoholics, make this pledge many times in their … Read More

0 comments:

Post a Comment