Wednesday 11 March 2015

उत्तम अभिव्यक्तीसाठी

उत्तम अभिव्यक्तीसाठी..*
> चांगली अभिव्यक्ती हा विषय सर्वस्पर्शी आहे. कुठलेही काम करताना त्याच्या
> मांडणीविषयी सविस्तर विचार करायला हवा. आपल्या शिक्षण पद्धतीत केवळ घोकंपट्टी
> करून चांगले मार्क मिळवता येतात, हे विद्यार्थ्यांच्या मनात कुठे तरी पक्कं
> बसलेलं असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल हा दिलेलं उत्तर पाठ करून तसंच्या
> तसं लिहून बरे मार्क मिळवण्याकडे असतो. अशा रेडिमेड मांडणीमुळे स्वत:चा विचार
> करण्याची, उत्तराची स्वतंत्र मांडणी करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता विकसित
> होत नाही. उत्तराचा विचार, आपल्या शब्दांत उत्तर देण्याची तयारी आणि विचाराची
> नेमक्या शब्दांतली मांडणी या सरावापासून बहुसंख्य विद्यार्थी कोसभर दूर
> राहतात. अभिव्यक्तीची क्षमता आपल्यात किती व कशी आहे, ती कशी विकसित करता
> येईल, याचे भान येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.
> *अभिव्यक्ती क्षमता सुधारण्यासाठी..*
> ज्या व्यक्ती/समूहासाठी आपल्याला सादरीकरण करायचं आहे, त्यांची 'मानसिकता
> जाणून घेण्यामुळे', विद्यार्थी, व्यावसायिक, कलाकार अशा कुठल्याही भूमिकेतील
> अभिव्यक्तींच्या पातळीत खूप फरक पडतो. त्यांच्या नेमक्या गरजांपर्यंत आपण
> पोहोचलो आहोत हा विश्वास समोरच्या व्यक्तीला आपल्याकडून हवा असतो. त्यांची गरज
> कळल्यानंतर आपल्याला त्यांच्यापर्यंत काय पोहोचवायला हवं आहे हे स्पष्ट होतं.
> अभिव्यक्ती क्षमता टप्प्याटप्प्याने विकसित करण्यासाठी समोरच्या व्यक्ती अथवा
> समूहाची मानसिकता जाणून घेणं, त्यांच्या नेमक्या गरजांच्या उत्तरांवर लक्ष
> केंद्रित करणं आणि आपल्याला त्यांच्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे हे स्पष्ट
> होणं असा प्राधान्यक्रम निश्चित
> करायला हवा.
> ज्याला सांगायचं आहे, त्याला कळणाऱ्या भाषेत, कळणाऱ्या पद्धतीनं ते येणं,
> नेमक्या शब्दांत ते व्यक्त करणं, त्यामागचा उद्देश समोरच्यांपर्यंत
> पोहोचवण्यासाठी काम करणं, या गोष्टी जमणं म्हणजेच आपल्या क्षमतेला विकसित
> अभिव्यक्तीची
> जोड मिळणं.
> *अभिव्यक्तीची पूर्वतयारी कशी कराल?*
> समोरची व्यक्ती, समूह, कंपनी.. अशा ज्यांच्यापुढे आपल्याला आपलं काम मांडायचं
> आहे, त्यांची नेमकी गरज काय आहे, त्यांची पाश्र्वभूमी (शिक्षण, भाषा, वयोगट
> इत्यादी) काय आहे, माहितीच्या सादरीकरणामागचा माझा उद्देश नेमका कोणता, मला
> त्यातून काय संपादन करायचे आहे.. या सगळ्याची उत्तरे परस्परांशी खूप जोडलेली
> आहेत. या सगळ्याचा स्वतंत्र आणि एकत्रित विचार जी स्पष्टता देतो, ती स्पष्टता
> विद्यार्थी, व्यावसायिक, कलाकार या सर्वासाठी आवश्यक असते.
> विद्यार्थ्यांपासून, मार्केटिंग व्यावसायिकांपर्यंत आणि स्वत:चा बायोडेटा
> लिहिण्यापासून आपल्या कलेच्या, उत्पादनाच्या सादरीकरणापर्यंत सर्व ठिकाणी,
> मुद्दय़ांची नेमकी निवड आणि सादरीकरणाची सुसूत्र मांडणी करण्यास या स्पष्टतेची
> मदत होते.
> *अभिव्यक्ती क्षमतेचा विकास*
> प्रत्येक विषयातील अभ्यासाचा किंवा विषय समजण्याचा प्राथमिक टप्पा पार
> झाल्यानंतर, 'दुसऱ्यांना ते समजेल आणि त्यांना ते ऐकावंसं, पाहावंसं, वाचावंसं
> वाटेल, यासाठी मी ते कसं मांडू?' याचा विचार व्हायला हवा. केवळ ज्ञान असून
> चालत नाही तर ते नेमकेपणानं सादर करता यायला हवं, हा विचार/सवय खरं तर शालेय
> वयापासूनच रुजायला हवी. शाळा-महाविद्यालयांतील विविध प्रसंगी तसेच कौटुंबिक
> स्नेहमेळाव्यांमध्ये व्यासपीठावरून बोलण्याचा सराव करावा.

0 comments:

Post a Comment