‘जेईई-मेन’चा अर्ज भरलात का?
इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या जेईई-मेन या परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. ४ एप्रिल २०१५ला पेन आणि पेपर पद्धतीचा पेपर होणार असून, कम्प्युटर-बेस्ड परीक्षा १० आणि ११ एप्रिल अशा दोनच दिवशी होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे मुद्दे येथे नमूद करीत आहोत.
अर्जप्रक्रिया
'जेईई-मेन'साठी यंदा केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारले जातील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी www.jeemain.nic.in या वेबसाइटवरून अर्ज भरावेत. अर्ज भरण्यासाठी अखेरची तारीख : १८ डिसेंबर अर्ज भरण्यापूर्वी www.jeemain.nic.in या वेबसाइटवर अपलोड केलेले इन्फर्मेशन ब्रोशर विद्यार्थ्यांनी तपशिलात वाचणे महत्त्वाचे आहे. अर्ज भरण्याच समस्या असल्यास काही ठिकाणी मदत केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्याची सविस्तर यादीही वेबसाइटवर आहे.
परीक्षेबाबत...
जेईई-मेन २०१५ मध्येही पेपर-१ (बीई/बीटेक) आणि पेपर-२ (बीआर्च/बीप्लॅनिंग) असे दोन पेपर असतील. विद्यार्थ्यांना ज्या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्यानुसार त्यांनी त्या-त्या पेपरसाठी किंवा दोन्ही पेपरला बसायचे असल्यास त्यानुसार, अर्ज करणे अपेक्षित आहे. पेपर-१ आणि पेपर-२ साठी कोणते विषय असतील, त्याचा तक्ता पुढीलप्रमाणे,
परीक्षेसाठी पात्रता
खुला प्रवर्ग : १ ऑक्टोबर १९९० नंतरचा जन्म एससी/एसटी/अपंग : १ ऑक्टोबर १९८५ नंतरचा जन्म सन २०१३ किंवा २०१४ मध्ये बारावीची परीक्षा पास झालेले किंवा सन २०१५ च्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी परीक्षेस पात्र. एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त ३ वेळा जेईई-मेन देता येते. महाराष्ट्रातील प्रवेशांसाठी राज्य सरकारची पात्रता ग्राह्य असेल.
ऑनलाइन अर्ज भरताना...
सर्वप्रथम इन्फर्मेशन बुलेटिन डाउनलोड करा आणि पात्रतेविषयीचे निकष काळजीपूर्वक वाचा. इन्फर्मेशन बुलेटिनमधील ऑनलाइन अर्जप्रक्रियेबाबतच्या सूचना व्यवस्थित वाचा. तुमचा फोटो, सही आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा स्कॅन करून जेपीजी फॉर्मेटमध्ये तयार ठेवा. ऑनलाइन अर्ज भरा. स्कॅन केलेल्या इमेजेस अपलोड करा. परीक्षा फी डेबिट/क्रेडिट कार्डने किंवा ई-चलन पद्धतीने भरा. अॅकनॉलेजमेंट स्लिप डाउनलोड करून ठेवा. विद्यार्थ्याने ऑनलाइन अर्ज भरताना स्वतःचाच मोबाइल फोन क्रमांक आणि ई-मेल आयडी नमूद करावा. विद्यार्थ्यांना यावरच पुढील सूचना मिळणार आहेत. अधिक माहिती : jeemain.nic.in
पेपर-१ : बीई/बीटेक सर्व पदवी अभ्यासक्रम
पेपर-२ : बीआर्च/बीप्लॅनिंग (आयआयटी सोडून इतर संस्थांतील प्रवेशांसाठी)
वेळापत्रक (पेन-पेपर पद्धतीच्या पेपरसाठी)
परीक्षेची तारीख पेपर वेळ ४ एप्रिल २०१५ (शनिवार) पेपर-१ स. ९.३० ते दु. १२.३० ४ एप्रिल २०१५ (शनिवार) पेपर-२ दु. २ ते सायं. ५ वेळापत्रक (कम्प्युटर-बेस्ड पद्धतीच्या पेपरसाठी) परीक्षेची तारीख पेपर वेळ १० एप्रिल (शुक्रवार) पेपर-१ पहिली शिफ्ट स. ९.३० ते दु. १२; दुसरी शिफ्ट (गरज पडल्यास) दु. २ ते सायं. ५
पेपर विषय प्रश्नप्रकार परीक्षेचे स्वरूप
पेपर-१ फिजिक्स, केमिस्ट्री फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणितावर पेन-पेपर किंवा (बीई/बीटेक) आणि गणित प्रत्येकी समान गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न कम्प्युटर-बेस्ड परीक्षा पेपर-२ गणित (भाग-१), वस्तुनिष्ठ प्रश्न फक्त पेन आणि (बीआर्च/बीप्लॅनिंग) अॅप्टिट्यूड टेस्ट (भाग-२) पेपर पद्धत आणि ड्रॉइंग (भाग-३)
0 comments:
Post a Comment