Wednesday 1 April 2015

क-कल्पनाशक्तीचा




क-कल्पनाशक्तीचा
पालकांना एकच सांगावसं वाटत की, पुढे जाऊन तुमचं मूल स्वतः कसं आहे यावरच त्याची प्रगती अवलंबून आहे. तुम्ही जितका त्याला स्वत:चा शोध घेऊ द्याल तितकं ते अधिक स्वयंप्रज्ञ, स्वतंत्र होईल. तेव्हाच ते समाजात उठून दिसेल. आपल्या मुलाची तुलना इतरांशी करणं म्हणजे अविश्वास दाखवणं आहे.

कल्पकता हे जीवनमूल्य म्हणून रुजवा
कल्पकता हे जीवनमूल्य आहे हे तर आपण जाणून घेतलं. आता ते जीवनमूल्य आपल्यात रुजवण्यासाठी आपण काय करू शकतो त्याचा जरा विचार करू या. कल्पकता आपल्याला आपल्या स्व ची ओळख करून देते. मी कोण आहे ? मी काय करू शकतो हे आपल्याला त्यामुळेच हळूहळू कळायला लागतं. उदा. एखादा गायक कधीतरी संगीतकार म्हणून पण काम करतो. एखादा संगीतकार दिग्दर्शक बनू पाहतो. कारण त्याला स्वत:चा अधिकाधिक शोध लागत जातो. त्याला हे लक्षात येत की जोपर्यंत मी अधिकाधिक प्रयोग करणार नाही तोपर्यंत माझेच काही पैलू मला अज्ञात राहतील. ही प्रयोगशीलता त्याला आव्हानही देते आणि त्याच्याकडून नवनिर्मितीही घडवून आणते म्हणजेच काय की जर आपल्याला कल्पकता हे जीवनमूल्य म्हणून आपल्यात, आपल्या मुलांमध्ये रुजवायचा असेल तर त्याला आव्हान देण्याची गरज आहे.

आपल्या शिक्षण पद्धतीत कुठेही कल्पकतेने विचार कसा करावा हे शिकण्याची संधी दिली जात नाही. या गोष्टीला जितकी ही पद्धत जबाबदार आहे तितकेच मार्कांचा हव्यास धरणारे पालकही. माझ्या कामाच्या निमित्ताने अनेक संस्थाचालकांशी संपर्क आला. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितल की, आम्ही जेव्हा शिक्षकांना सांगितला की मुलांना मार्क देऊ नका, त्यावेळी पालक भांडायला आले की मग आमचा मुलगा कुणाच्या किती पुढे किंवा मागे आहे हे कसं कळणार. थोडक्यात काय तर माझ्या मुलाची प्रगती माझ्यासाठी फक्त महत्त्वाची आहे तर इतरांचं तुलनेत त्याची प्रगती कशी आहे हे जाणून घेण्यात मला जास्त रस आहे असाच जणू पालकांना म्हणायचं होतं. अशा पालकांना एकच सांगावसं वाटत की, पुढे जाऊन तुमचं मूल स्वतः कसं आहे यावरच त्याची प्रगती अवलंबून आहे. तुम्ही जितका त्याला स्वताचा शोध घेऊ द्याल तितकं ते अधिक स्वयंप्रज्ञ, स्वतंत्र होइल. तेव्हाच ते समाजात उठून दिसेल. आपल्या मुलाची तुलना इतरांशी करणं म्हणजे त्याच्यावर अविश्वास दाखवणं आहे.

स्वत:चा पूर्ण शोध घ्या
कल्पकता आपल्याला आपल्या स्व ची ओळख करून देते. मी कोण आहे ? मी काय करू शकतो हे आपल्याला त्यामुळेच हळूहळू कळायला लागतं. उदा. एखादा गायक कधीतरी संगीतकार म्हणून पण काम करतो. एखादा संगीतकार दिग्दर्शक बनू पाहतो कारण त्याला स्वत:चा अधिकाधिक शोध लागत जातो.कल्पक विचारपद्धती
कल्पक विचारपद्धती अर्थात Creative Thinking (क्रिएटिव्ह थिंकिंग)! मुरे नावाचा मानस शास्त्रज्ञ म्हणतो की कल्पकतेने विचार करण्यात चार प्रमुख घटक असतात. एक म्हणजे व्यक्ती , दुसरा म्हणजे संस्करण (Process), तिसरा उत्पादन आणि चौथा वातावरण. व्यक्ती म्हणजे तिचे अंगभूत गुण दोष. हे आपण फारसे बदलू शकत नाही. संस्करण हा एक महत्त्वाचा घटक आहे . हा घटक शिक्षणाद्वारे नियंत्रित केला जातो.

वातावरण, उत्पादन आणि नवनिर्मिती
तिसरा घटक आहे तो म्हणजे उत्पादन. इथे आपण नवनिर्मिती असं म्हणू शकतो. कल्पकतेने विचार केल्यावर आपल्याकडून नेहमीच नवनिर्मिती होते. ती नवनिर्मिती कधी मूर्त (चित्र ,शिल्प, कविता इत्यादी )असते तर कधी अमूर्त (नवीन विचार, कल्पना, सिद्धांत ). चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे वातावरण. आपल्या आजूबाजूच वातावरण कसं आहे याचा आपल्या कल्पकतेवर खूप परिणाम होत असतो. हे वातावरण आपल्या घरातलं, शाळेतलं , ऑफिसमधलंही असतं. मी गेली अनेक वर्षे शालेय वातावरणाचा मुलांवर होणारा परिणाम याच विषयावर अभ्यास करते आहे. त्याबद्दल सविस्तर पुन्हा कधीतरी. पण इथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कुणाच्याही कल्पनाशक्तीला आव्हान द्यायचे असेल तर या चारही घटकांचा विचार केला पाहिजे.

गरज ही शोधाची जननी
असं म्हटलं जातं ते खरंच आहे. गरजेतूनच आव्हानाची निर्मिती होते. हे आव्हान कल्पकतेला सजग करतं. कल्पकतेला सातत्याने आव्हान दिलं गेलं तर त्यातूनच ती फुलते. नाहीतर ज्याप्रमाणे फारशा वापरत नसलेल्या वस्तूंना गंज चढतो तसाच तो मेंदूलाही चढतो आणि मग हळूहळू आपण आपली कल्पकता हरवून बसतो. हे आव्हान आपल्याला मिळतं कुठून? हे आव्हान आपल्याला मिळतं छोट्या छोट्या समस्यांमधून. कधी त्या दैनदिन जीवनातल्या असतात तर कधी व्यावसायिक जीवनातल्या. या समस्या सोडवण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हाच आपल्याला त्याची उत्तर सुचतात. कधी कधी ती सहज सापडतात तर कधी कधी ती फार शोधावी लागतात. त्यावेळीच आपला मेंदू अगदी सजग होतो आणि निरनिराळ्या पर्यायांचा विचार करू लागतो ज्याला आपण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग अथवा चाकोरीबाहेरचा विचार असं म्हणू शकतो. समस्या जितकी बिकट तितकं आव्हान जास्तं. पण म्हणून नुसत्या समस्या समोर उभ्या करून चालणार नाही तर त्या समस्या सोडविण्यासाठी कशाप्रकारे विचार करावा याची पद्धतही शिकवावी लागेल.(शब्दाकंन : मोहिनी घारपुरे-देशमुख)
(संचालक, काैन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन, सीसीई फिनलंड)
shirin.kulkarni@ccefinland.org

0 comments:

Post a Comment