Saturday, 6 June 2015

दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या जाहीर होणार

दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या जाहीर होणार
मुंबई - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल सोमवारी (ता. 8) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. राज्यभरातून 17,32,898 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी 9,59,000 विद्यार्थी; तर 7,73,448 विद्यार्थिनी आहेत. मुंबई विभागातून एकूण 3,82,437 विद्यार्थ्यांनी दहावीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,06,878 विद्यार्थी; तर 1,75,579 विद्यार्थिनी आहेत.
पुढील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. 

एसएमएसद्वारेही निकालाची माहिती मिळू शकेल. बीएसएनएलला mhssc Seat No. हा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवता येईल. एअरटेलसाठी MH10 Seat No. हा मेसेज 5207011 या क्रमांकावर पाठवता येईल. अन्य मोबाईल ऑपरेटर्ससाठी MH10 Seat No. 58888111 या क्रमांकावर मेसेज पाठवता येईल.
विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या शाळेत 15 जून रोजी दुपारी 3 वाजता मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यावर विहित नमुन्यात, विहित शुल्कासह 25 जूनपर्यंत अर्ज संबंधित विभागीय मंडळाकडे करायचे आहेत. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील. इंटरनेटवरच्या गुणपत्रिकेच्या आधारे केलेले अर्ज अवैध ठरवण्यात येतील. छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत 8 जून ते 29 जून अशी आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल; मात्र पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास अधिक माहितीसाठी मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 comments:

Post a Comment