Friday, 21 November 2014

ग्रंथालय : राष्ट्र विकासातील समृद्ध वाटचाल

ग्रंथालय : राष्ट्र विकासातील समृद्ध वाटचाल -  तंत्रज्ञान, शोध , ज्ञान आणि माहिती आधारित अर्थव्यवस्था
प्रस्तावना :
मानवाच्या विकास यात्रेविषयी नोबेल पुरस्कार विजेते जोसेफ स्टिगलीटंज यांचे “क्रिएटिंग ए लर्निग सोसायटी” हे पुस्तक प्रकाशित झाले त्या त्यांनी म्हटले की “ कोणत्याही देशाचा विकास हा त्यामध्ये भांडवली गुंतवणूक किती प्रमाणात होते यावर अवलंबून नसून त्या देशातील लोकांची, समाजाची शिकण्याची आणि ज्ञान घेण्याची किती जिज्ञासा आहे , क्षमता आहे आणि ती कशी आहे यावर अवलंबून असतो.  तंत्रज्ञान, शोध आणि माहिती आधारित अर्थव्यवस्था निर्माण होत असून त्यामध्ये ग्रंथालय महत्वपूर्ण भूमिका घेऊन राष्ट्र विकासाची समृद्ध वाटचाल तयार करू शकते. भारत हे वाचनसंस्कृती आणि साहित्यपरंपरा लाभलेलं राष्ट्र आहे. राष्ट्र विकासातील समृद्ध वाटचालीत ग्रंथालय महत्वपूर्ण सहयोग देत आहेत. राष्ट्राच्या शेक्षणिक , राजकीय , सामाजिक , आर्थिक व वेज्ञानिक अश्या सर्वच क्षेत्रात ग्रंथालय समृद्ध होत आहेत . ग्रंथालयाचे राष्ट्र विकासातील महत्व सिद्ध करून लोकांना ग्रंथालयाकडे आदर्श , सृर्जनात्मक , सुसस्कृत समाजाचा आधारस्तंभ म्हणून पाहायला लावणे हा या संशोधनाच उद्धेश असा आहे . ग्रंथालयातील अत्यावशक , नवीन आणि उपयुक्त विषयावर संशोधन करून त्याचे राष्ट्र विकासाच्या समृद्ध वाटचालीतील महत्व सांगून ग्रंथालयाचा राष्ट्र विकासातील सहभाग वाढवणे हे या संशोधनाचे वेशिष्ट्ये आहे . ग्रंथालय आणि अन्य क्षेत्रातील वाचक, अभ्यासक , संशोधक व विध्यार्थी यांना हे संशोधन निश्चितच उपयुक्त ठरेल.
 राष्ट्रीय ग्रंथालय , सार्वजनिक ग्रंथालय , विशेष ग्रंथालय,  शेक्षणिक ग्रंथालय , संशोधन ग्रंथालय , डिजिटल ग्रंथालय आणि ग्रंथालयीन माहिती केंद्र अश्या विविध प्रकारचे ग्रंथालय आपल्या ग्रंथालयीन सेवा देऊन राष्ट्र विकासाला सहकार्य करतात. हे लक्षात घेवून भारत शासनाने माहिती राष्ट्रीय धोरण स्वीकारले आणि राष्ट्रीय ज्ञान आयोग स्थापन केला .
ग्रंथालय: राष्ट्र विकासातील समृद्ध वाटचाल एक अभ्यासया संशोधनात आपल्याला खालील अभ्यास विषयावर उत्तम असे संशोधन करून ग्रंथालयाचे राष्ट्र विकासातील महत्व सिद्ध करता येईल.
1.   राष्ट्रीय ग्रंथालय            : राष्ट्र विकासात योगदान
2.   सार्वजनिक ग्रंथालय         : राष्ट्र विकासाचा आधारस्तंभ
3.   शेक्षणिक ग्रंथालय           : राष्ट्राच्या शेक्षणिक विकासाचा मानदंड
4.   संशोधन ग्रंथालय           : संशोधन विकासाच्या कार्याचा दीपस्तंभ
5.   विशेष ग्रंथालय             :  समृद्ध राष्ट्राची विशेष ओळख
6.   डिजिटल ग्रंथालय           : राष्ट्र विकासातिल एक नवे क्षितिज
7.   ग्रंथालय माहिती केंद्र        : राष्ट्र विकासावर होणारा प्रभाव
8.   ग्रंथालय 2.0 संकल्पना       : राष्ट्र विकासाचे गतिमान साधन
9.   भारतीय माहिती धोरण       : राष्ट्र विकासाचे नियोजन
10.  राष्ट्रीय ज्ञान आयोग        : राष्ट्र विकासासाठी ज्ञानमय राष्ट्र
11. डिजिटल भारत              :  ज्ञानाधिष्टीत सामाजिक आणि आर्थीक क्रांती
आजची अर्थव्यवस्था ज्ञानाधिष्टीत होत आहे . आज राष्ट्राची सर्व शासकीय व्यवस्था ही  ज्ञान केंद्रीत होत आहे . माहिती आणि तंत्रज्ञानात अग्रेसर राष्ट्र आज विकसित होत आहेत. त्यामुळे आपल्याला  ज्ञान न्रिमितीची, संकलन आणि प्रसारांची केंद्रे असलेली ग्रंथालय समृद्ध करून राष्ट्र विकासाला चालना द्यावी लागेल. तरच एक सुस्ंकृत , सुजाण , सर्जनशील , स्नेहमय राष्ट्र विकासीत होईल.

1.   राष्ट्रीय ग्रंथालय : राष्ट्र विकासात योगदान
प्रत्येक राष्ट्राची एक स्वता: ची संस्कृती आणि इतिहास असतो.  त्यांचे संवर्धन , जतन आणि प्रसारण करण्यासाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केली जातात. देशाच्या ग्रंथालय पध्दतीत राष्ट्रीय पातळीवर असणारी ग्रंथालय म्हणजे राष्ट्रीय ग्रंथालय होय.  राष्ट्रीय ग्रंथालयाचे प्रमुख वेशिष्ट्ये म्हणजे या ग्रंथालयत सर्व ज्ञानशाखेतील ग्रंथ संग्रह असतो . ग्रंथालयातील कर्मचारी विविध विषयातील प्रशिक्षित असतात .
राष्ट्रातील वाचन साहित्याचे कायदेशीर जतन करण्याचे उद्धिष्ट असल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्रंथसूची तयार करणे सहज शक्य होते . देशाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा ज्यातून व्यक्त होते असे सर्व वाचन साहित्य संग्रहित करणे हे राष्ट्रीय ग्रंथालयाचे प्रमुख कार्य आहे .
राष्ट्रातील सर्व क्षेत्रातील ग्रंथालयांना मार्गदर्शन करणे. राष्ट्रात प्रकाशित होणारी ग्रंथ आणि ग्रंथेत्तर साहित्य संग्रहीत, जतन आणि प्रसारित करणे. शासनाला ग्रंथ सेवा देणे, देशा विषयी प्रकाशित साहित्य संग्रहित करणे . देशाविषयी आवश्यक परदेशी साहित्याचे संवर्धन करणे तसेच वाचन साहित्य, ग्रंथकोशांविषयी आणि दस्तऐवज आणि सेवा याविषयी रेफरल केंद्र म्हणूनही कार्य करून राष्ट्रीय ग्रंथालय राष्ट्र विकासात योगदान देते.
भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय कलकत्ता येथे आहे. राष्ट्रीय ग्रंथालय भारतातील संस्कृती मंत्रालय व सरकार अंतर्गत स्थापन केलेली महत्त्वाची एक राष्ट्रीय संस्था आहे. तसेच भारतात नॅशनल मेडिकल लायब्ररी , नॅशनल सायन्स लायब्ररी , नॅशनल अर्गिकल्चरल रिसर्च लायब्ररी इ. राष्ट्रीय ग्रंथालय आपल्या सेवा आणि कार्य करून राष्ट्र विकासात योगदान देताना दिसतात .






2.   सार्वजनिक ग्रंथालय : राष्ट्र विकासाचा आधारस्तंभ
राष्ट्र विकासाच्या वाटचालीत सार्वजनिक ग्रंथालय महत्वाचा आधारस्तंभ म्हणून कार्य करतात. लोकांचे , लोकांसाठी लोकांनी चालवलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय. सार्वजनिक ग्रंथालय हे लोकांचे विश्वविद्द्यापीठ आहे. लोकांच्या सहकार्‍यातून चालवली जाणारी लोकसंस्था आहे . ही ग्रंथालय ज्ञान व माहितीचे आगर आहेत. राष्ट्रातील एक सांस्कृतिक केंद्र म्हणुन ही ग्रंथालये सेवा देतात.
यूनेस्कोने सार्वजनिक ग्रंथालयचा जाहीरनामा 1949 मध्ये प्रकाशित केला. त्या मध्ये सार्वजनिक ग्रंथालया बाबत असे म्हटले आहे की , “सार्वजनिक ग्रंथालय ही शिक्षण , संस्कृती व महितीचा स्त्रोत असून ही अंतरराष्ट्रीय सामजस्य आणि शांततेचे प्रतीक आहे.” म्हणूनच म्हणावेसे वाटते की सार्वजनिक ग्रंथालय ही स्थानिक पातळीपासून ते अंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विकास कार्यात सहभागी होऊन राष्ट्र विकासाचा आधारस्तंभ होतात.
कोणतीही व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ आणि ग्रंथालयाचं महत्त्व अनन्य साधारण असं आहे. बौद्धिक विकासाचं शक्तिकेंद्र आणि सामाजिक विकासाचं उर्जाकेंद्र म्हणून सार्वजनिक ग्रंथालयाची आवश्यकता असते. राज्यातील ग्रामीण आणि शहरी विभागातील जनतेला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रातील विविध बाबींची आणि विविध विषयांची परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी सार्वजनिक ग्रंथालय कार्य करते .
भारतात 6 लाख 25 हजार गांव आहेत. त्या सर्व गावात सार्वजनिक ग्रंथालय स्थापन केल्यास 6 लाख 25 हजार सार्वजनिक ग्रंथालय निर्माण होतील आणि त्यामध्येमातून आपण शासनाच्या विविध योजना , बाजारपेढेची माहिती ,  शिक्षण प्रसार , सामाजिक आणि आर्थिक विकास करता येईल. तसेच ग्रामीण विकासा संबंधित जागृती कार्यक्रम ,मानवाधिकार व सामाजिक विकास संबंधित कार्यक्रम , युवक, महिला आणि बाल विकास संबंधित कार्यक्रम, आरोग्य संबंधित कार्यक्रम ,पर्यावरण पर्यावरणशास्त्र आणि जैव विविधता विकास कार्यक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास कार्यक्रम ,कला आणि संस्कृती संबंधित कार्यक्रम इ॰ विकास संबंधित कार्यक्रम ग्रंथालयाच्या माध्यमातून घेऊन राष्ट्र विकास केला जातो .
3.शेक्षणिक ग्रंथालय : राष्ट्राच्या शेक्षणिक विकासाचा मानदंड
शेक्षणिक संस्थेशी संबंधीत ग्रंथालय म्हणजे शेक्षणिक ग्रंथालय होय.  विद्यार्थ्यांना भावी जीवनात मानाचे आणि योग्य स्थान मिळावे म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा . विद्यार्थ्यां मध्ये असलेली वाड: मयीन आणि कलात्मक गुणाची वाढकरण्याच्या उद्देशाने शेक्षणिक ग्रंथालय स्थापन केली जातात. सामाजिक , आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, तांत्रिक, नैतिक समृद्धी एक शांत सामाजिक चळवळ म्हणून दिशा देणे, एक कृतीशील भूमिका बजावने आणि वाढणे किंवा समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन कार्य करणे हे शेक्षणिक ग्रंथालयाच्या माध्यमातून सहज होऊ शकते.

शिक्षण मानवी आणि आर्थिक विकासाची एक महत्वाची गुंतवणूक आहे. महाविद्यालये, विद्यापीठे, प्रयोगशाळा, कौशल्य विकास केंद्रे, स्पर्धापरीक्षा तयारी केंद्रे, योग आणि आध्यात्मिक केंद्रे, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे, व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण केंद्रे संशोधन आणि इतर संस्था मध्ये ग्रंथालय स्थापन करून शिक्षण आणि ज्ञान करून विकास आणि प्रगती करणे शक्य होईल.
पाठ्यपुस्तके सर्वाधिक प्रमाणात आपल्या राष्ट्रीय संस्कृती प्रतिनिधित्व करणारे शौक्षणिक साधन म्हणून वापरले जाते. पाठ्यपुस्तकातून आपले राष्ट्र , राष्ट्रीय मूल्ये, संस्कृती, विचारधारा आणि जीवन प्रणाली यांचे दर्शन घडते. राष्ट्रीय संस्कृती, सामाजिक मूल्य आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी प्रभावी माध्यम आहे.
राष्ट्रीय विकास मिशन ची 2005 मध्ये स्थापना करण्यात आली. महिला व मुलींचे कल्याण कार्यक्रम, महिला शिक्षण कार्यक्रम, पर्यावरण जागृती कार्यक्रम, आरोग्य आणि स्वच्छता कार्यक्रम, कृषी आणि फळबाग कार्यक्रम, अजा / अज विकास कार्यक्रम, पुर नियंत्रण शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती, क्विझ स्पर्धा, रोड सुरक्षा जागृती कार्यक्रम , तसेच प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम सध्या कार्यरत आहे. राष्ट्र विकास मिशनचे कार्य ग्रंथालयाच्या सहकार्याने उत्तम करता येऊ शकते .
उमेश मल्होत्रा यांनी सन 2004 मध्ये हिप्पोकंपस रीडिंग संस्था स्थापन करून हिप्पोकंपस वाचनालय शाळेच्या माध्यमातून सुरू केली. तसेच सन 2005 मध्ये तमिळनाडू येथे 95 सरकारी आणि खाजगी शाळाच्या माध्यमातून वाचनलये सुरू करण्यात आली . त्याचा फायदा पंचेचाळीस हजार मुलांना झाला.सन 2010 मध्ये  वाचनखोली या नावाने एक उपक्रम 100 हून अधिक शाळेत सुरू करण्यात आला.
हिप्पोकंपस लर्निग सेंटर च्या मध्येमातून शाळा आणि अंगनवडया सुरू करून त्यात वाचनालय स्थापन केली . या उपक्रमातून उमेश यांनी गणित , विज्ञान आणि जीवन शिक्षण या सारखे विषयांचे ज्ञान दिले. या उपक्रमासोबतच इतर शाळांना मदत होतील असे वाचनालयाशी संबंधित उपक्रम , कार्यशाळा , प्रशिक्षण , शिष्यवृती इये कार्य हिप्पोकंपस संस्थेच्या मध्येमातून केली जातात. अशा प्रकारचे उपक्रम भारतातील सर्व शाळेत घेतल्यास ज्ञानमय समाज निर्माण होईल आणि त्यातून समृद्ध राष्ट्र विकसित होईल.  
आपण  एका  चौकस आणि नावीन्यपूर्ण-ज्ञान देणार्‍या समाजात जगत आहोत. आपल्याला जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर संशोधन आणि विश्लेषणात्मक विचार, कौशल्य आणि वृत्ती विकसित करण्यात शेक्षणिक ग्रंथालयाल  महत्वाची भुमिका बजावून राष्ट्राच्या शेक्षणिक विकासाचा मानदंड ठरतात .
4.संशोधन ग्रंथालय : संशोधन विकासाच्या कार्याचा दीपस्तंभ
संशोधनाचे चक्र ग्रंथलयातून सुरू होते. संशोधन संस्थेमध्ये असणारे ग्रंथालय म्हणजे संशोधन ग्रंथालय होय.  ज्ञांनाच्या सर्व शाखांमध्ये संशोधन आणि विकास होत असतो. त्यामुळे विज्ञान ,अर्थशास्त्र व राज्यशास्त्र अशा क्षेत्रातील संशोधनासाठी स्वतंत्र संस्था आणि ग्रंथालय यांची आवश्यकता निर्माण झाल्याने त्या –त्या क्षेत्रात संशोधन ग्रंथालय  स्थापन होऊ लागली.  संशोधन संस्थेमध्ये उच्च दर्जाचे संशोधन व्हावयास पाहिजे असेल तर सुसज्ज आणि समृद्ध ग्रंथलय हवे . ग्रंथालय वाचन साहित्या सोबतच संशोधनासाठी लागणार्‍या अनेक सोयी- सुविधा पुरवते. संशोधन संस्थेत कार्याची सातत्याता धारण करण्याचे कार्य ग्रंथालय करतात कारण संस्थेत संशोधक येतात – जातात पण संस्थेचे कार्य दृश्य स्वरुपात ठेवणायचे काम ग्रंथालय करतात. संशोधन ही  सर्जनशीलता असते आणि ही सर्जनशीलता ज्ञांनातून निर्माण होते . ज्ञान निर्मिती, संग्रह आणि प्रसार – प्रचार करणारे भांडार म्हणून संशोधन ग्रंथालय कार्य करतात.
ग्रंथ , दुर्मिळ साहित्य, शासकीय प्रकाशने, संशोधन अहवाल व प्रबंध , पेटंट्स, मानके, ग्रन्तेत्तर संशोधन साहित्य,  ताम्रपट, भुर्जपत्रे , हस्तलिखिते , चित्रे, छायाचित्रे, महितीपत्रे आणि संगणकीय साहित्य इ. वाचन साहित्य संशोधन ग्रंथालयात उपलब्ध असते. या वाचन साहित्यातून संशोधकास नवी माहिती आणि ज्ञान मिळून नव नवीन संशोधन निर्माण होतात.
प्रचलित जागरूकता सेवा, निवडक माहिती प्रसारण सेवा, सार सेवा, निर्देशन सेवा, संदर्भसेवा, सूचिकरण , भाषांतर, प्रलेख प्रदान, प्रतिलिपी , इटरनेट आणि इतर संगणकीय सेवा संशोधन ग्रंथालयातून देण्यात येतात. भांडारकर प्राच्यविद्ध्या संशोधन मंदिर पुणे , राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा , पुणे. गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे. श्री. एकनाथ मंदिर , ओरंगाबाद. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, पुणे . टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स , टिळक महाराष्ट्र विद्ध्यापीठ, पुणे. भारत साहित्य संशोधन संस्था , पुणे इ. विविध संशोधन संस्थेमध्ये संशोधन ग्रंथालय विविध विषयात संशोधन  कार्य करून राष्ट्र विकासाच्या वाटचालीत महत्वपूर्ण भुमिका करतात.  
5.विशेष ग्रंथालय: समृद्ध राष्ट्राची विशेष ओळख
माहिती युगात ज्ञान  मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने त्या ज्ञानाचे संकलन , संग्रह आणि वितरण योग्य वेळी योग्य व्यक्तिला करण्यासाठी विशेष ग्रंथालयाची गरज निर्माण झाली. त्यातून विविध क्षेत्रात विशेष ग्रंथालय स्थापन होऊ लागले.
“विशिष्ट ज्ञान क्षेत्रपुरती आणि विशिष्ट मर्यादेपुरती माहिती पुरवणारी ग्रंथालय म्हणजे विशेष ग्रंथालय होय. ” विशेष ग्रंथालय हे इतर ग्रंथलयापेक्षा वेगळे असून त्यांच्या माहिती निर्मिती संग्रह, जतन आणि वितरण करण्याच्या सेवे नुसार ते विशेष ठरते.
ग्रंथ , दुर्मिळ साहित्य, शासकीय प्रकाशने, संशोधन अहवाल व प्रबंध , पेटंट्स, मानके, ग्रन्तेत्तर संशोधन साहित्य,  ताम्रपट, भुर्जपत्रे , हस्तलिखिते , चित्रे, छायाचित्रे, महितीपत्रे आणि संगणकीय साहित्य इ. वाचन साहित्य या ग्रंथालयात उपलब्ध असते.
वाचन साहित्याचा विशेष संग्रह असतो. विशेष अभ्यासकांनाच सेवा दिली जाते.हे या ग्रंथालयाचे वेशिष्ट्ये आहे.आपल्या मातृसंस्थेची ध्येय- धोरणे प्रत्यक्षात आणणे हे या ग्रंथालयचे ध्येय असते.  विशेष ग्रंथालयचे प्रकार त्यांच्या वाचन साहित्य, सेवा आणि वाचका नुसार पडतात. प्रशिक्षण संस्था, औद्दोगिक संस्था, दवाखान्यातील ग्रंथालय, अंध आणि अपंगाचे ग्रंथालय, चित्रपट ग्रंथालय, हस्तलिखितेचे ग्रंथालय, आहार विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रंथालय, इ. विशेष ग्रंथालयाचे प्रकार आहेत.
विशेष ग्रंथालय हे आपल्या क्षेत्रा पुरती व्यापक माहिती संग्रहीत आणि जतन करून वाचकांना देतात . विशेष माहिती देणार्‍या प्रलेखांचा संग्रह करणे. संबंधित विषयाचा डाटाबेस तयार करणे. आंतर ग्रंथलयीन देव-घेव करण्यासाठी आपल्या राष्ट्रातील आणि आंतरराष्ट्रीय ग्रंथालयशी संपर्कात राहणे. सारसेवा , निर्देशन सेवा देणे. प्रचलित जागरूकता सेवा आणि निवडक माहिती प्रसारण सेवा देणे. अशा आपल्या विशेष सेवेद्वारे विशेष ग्रंथालय राष्ट्र विकासाच्या वाटचालीत दीपस्तंभ म्हणून कार्य करतात.
आयआयटी, सीएसआयआर, आयएसआरओ, आयआयऑफएस, आयएसआरओ, आयसीएआर, यासारख्या विशेष संस्था नव- नवीन शोध , नवे तंत्रज्ञान विकसित करून राष्ट्राला समृद्ध करीत आहेत.
6. डिजिटल ग्रंथालय  : राष्ट्र विकासातिल एक नवे क्षितिज
तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आणि शिक्षण प्रसारामुळे माहिती मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्या माहितीचे आणि वाचन साहित्याचे संगणकीकरन करून माहिती डिजिटल रूपात केली जाते . डिजिटल ग्रंथालय म्हणजे माहिती आणि ज्ञांनाच्या संघटित , विशाल संग्रहातून सुसंगत पध्दतीने माहिती शोध सुविधा पुरवणारी प्रणाली होय.
डिजिटल ग्रंथालयात ग्रंथोपर्जन, माहिती, वाचन साहित्य जतन, संग्रह पुनप्राप्ती , प्रदर्शन ही कार्य संगणकाच्या माध्यमातून केली जातात. माहितीचे डिजिटलझशन करून संग्रहीत आणि पुनप्राप्ती करणे. सीडीच्या रूपात डाटाबेस तयार करणे. संगणकीकृत ग्रंथ देव- घेव करणे हे डिजिटल ग्रंथालयाचे उद्देश आहेत.
सहकारी तालिका , संघ तालिका , वेब ओपक , आंतर ग्रंथलयीन ग्रंथ देव- घेव, रेफरल सेवा, ई- सेवा, बुलेटीन बोर्ड सेवा, इ. प्रकारच्या सेवा डिजिटल ग्रंथालयाच्या माध्यमातून देण्यात येतात.
आजची ग्रंथालयाचे रूपांतर 'ग्लोबल नॉलेज सेंटर्स'मध्ये होत आहे. संगणकीकरण ही त्याची पहिली पायरी आहे.
आज अस्तित्वात असलेली बहुतेक सर्व ग्रंथालये संगणकीकरणाचा विचार करताना दिसत आहेत. आता सर्व क्षेत्रांतील संगणकाचा वाढता वापर व त्यापासून होणारा लाभ सर्वांनाच आकर्षित करत आहेत आणि म्हणून आजची ग्रंथालये संगणकीकरण करत आहेत.
  आजच्या ग्रंथालयीन सेवेत केवळ संगणकाचाच वापर होतो असे नाही, तर मोबाइल, कॅमेरा, स्मार्टकार्ड, स्कॅनर, इ बुक रीडर, अशा अनेक आधुनिक साधनांचा वापर ग्रंथालयात होत आहे. वाचनसाहित्याच्या वर्गीकरणाचे काम तर त्यामार्फत होते आहेच, शिवाय वाचनसाहित्य ग्रंथालयात शोधण्याचे आधुनिक तंत्र विकसित होत आहे. ही सर्व काळाची पुढची पावले आहेत.
 ग्रंथालयांच्या आधुनिकीकरणात शासनाचेही योगदान सध्या दिसून येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात डिजिटल ग्रंथालय व त्याकरीता आवशक त्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ग्रंथालय संगणकीकरणाकरीता केंद्र शासनाच्या नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर (NIC)ने तयार केलेली संगणकीय प्रणाली मागेल त्या ग्रंथालयांना कसलेही शुल्क न आकारता दिली जाते. त्या प्रणालीच्या प्रशिक्षणाचे वारंवार आयोजन केले जाते. ग्रंथालय संगणकीकरणात येणाऱ्या समस्यांवरचा उपाय त्वरित ऑनलाइन सापडतो. आज अनेक ऑनलाइन फोरम उपलब्ध आहेत आणि ते सदैव मदत करत असतात.

 कार्णेजी मेलान विद्द्यपिठाने  “द मिलियन बुक्स प्रोजेक्ट” अर्तगत 10 लक्ष ग्रंथ ऑनलाइन केले आहेत. तसेच गुगल, मायक्रोसॉफ्ट, आणि अॅपल या कंपन्या देखील ग्रंथ ऑनलाइन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतात “आभाशी राष्ट्रीय ग्रंथालय ” स्थापन करण्यात आले आहे. शोधगंगोत्री प्रोजेक्ट द्वारे भारतातील पीएचडी प्रबंध ऑनलाइन प्रकाशित केले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदद्यापीठ, ओरंगाबाद यांनी 30 लाख ग्रंथ ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अकडेमिक प्रेस, हायवायर प्रेस, ओसीलसी आणि
ओव्हिड इ. संस्था डिजिटल माहिती सेवा पुरवतात. डिजिटल ग्रंथालय आपल्या नाविन्यपूर्ण आणि ऑनलाइन सेवा देऊन राष्ट्र विकासाच्या वाटचालीत महत्वाची भूमिका करतात.

7. ग्रंथालय आणि माहिती केंद्र : राष्ट्र विकासावर होणारा प्रभाव
आपण आपल्याकडील माहितीचे व्यवस्थापन कसे करतो यावर आपल्या राष्ट्राचा जय किंवा पराजय अवलंबून असतो. असे बिल गेट्स म्हणतात. आपल्या राष्ट्रात निर्मित होणार्‍या माहितीचे उत्तम व्यवस्थापन करून आपण आपल्या राष्ट्राला विकसित करू शकतो.
 विविध प्रकारच्या माहितीचे वैज्ञानिक पद्धतीने संकलन आणि वितरण करणारी एक अत्याधुनिक ज्ञानशाखा. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीनही कालसंदर्भात माहितीची गरज असते. माहितीशास्त्राच्या व्याप्तीचे नेमके मोजमाप करणे अशक्य आहे; कारण देशकालमानाच्या पार्श्वभूमीवर माहितीचे स्वरूप व माहितीसंपादनाचे हेतू यांत विविधता आढळून येते.
  आधुनिक काळातील मानवी जीवन अत्यंत गतिमान बनले आहे. सामाजिक व नैसर्गिक विज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत वेगाने नवे संशोधन पुढे येत आहे. एखाद्या विषयासंबंधी किंवा प्रश्नासंबंधी या बाबीसंबधी त्वरित निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अर्थात असा निर्णय घेणे हे सर्वांगीण, सूक्ष्म व काटेकोर माहितीच्या आधारेच शक्य आहे. विद्यमान काळातील वैज्ञानिक-तांत्रिक ज्ञानाचा परिस्फोट लक्षात घेतल्यास माहितीशास्त्राचा उदय एका अपरिहार्य गरजेतून झाला आहे. असे म्हणता येईल.
  विविध संदर्भात माहितीचे उत्पादन व वाढ करणे . माहितीचा संग्रह, जतन, संघटन आणि संस्करण करणे, वेगवेगळ्या संदर्भात माहितीचे प्रसारण आणि देवघेव करणे, व्यक्तीवर आणि समूहांवर माहितीच्या होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामांचा शोध घेणे. माहिती पद्धतीचा आराखडा तयार करून त्या संदर्भातील प्रगतीचा अभ्यास करणे, माहितीशास्त्राच्या आणि तंत्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, कायदेशीर परिणामांचा अभ्यास करणे.माहितीशास्त्राचे अध्यापन व संशोधन प्रगत करणे. हे ग्रंथालय आणि माहिती केंद्राचे महत्वपूर्ण कार्य आहेत.
   मानवी संस्कृतीच्या अतिप्राथमिक अवस्थेत जी काही मर्यादित स्वरूपाची माहिती उपलब्ध होत असे, तिची साठवणूक फक्त मेंदूच्या द्वारे व प्रसरण शब्दांच्या द्वारेच होऊ. मात्र उत्तरोत्तर मानव प्रगत होऊ लागला, त्याच्या गरजा वाढू लागल्या, कार्याची क्षितिजे विस्तारू लागली आणि परिणामतः नव्या ज्ञानाची, माहितीची आवश्यकता त्याला भासू लागली. माहिती निर्मितीचा ओघ जोपर्यंत मर्यादित होता, तो पर्यंत हवी असलेली माहिती परंपरागत तंत्राच्या द्वारे, म्हणजेच ग्रंथालयशास्त्राच्या आधारे , संग्रहित व प्रसारित केली जात असे.दुसऱ्या महायुद्धानंतर साहित्यनिर्मिती व ज्ञानप्रसार इतक्या झपाट्याने वाढत आहे की त्याचे नियंत्रण करण्यासाठी ग्रंथालयशास्त्रासारखे पारंपारिक स्वरूपाचे तंत्र थिटे वाटू लागले. सध्या जगात फक्त शास्त्रीय व तांत्रिक विषयासंबंधी प्रतिवर्षी ३० लक्ष प्रकाशन-पुस्तके लेख, निबंध, अहवाल, इ. प्रसिद्ध होत असतात. एका अंदाजानुसार या शतकाच्या अखेर प्रतिवर्षी दीड ते दोन कोटी प्रकाशने प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
मानवाच्या बौद्धीक सामर्थ्याबरोबरच या तंत्रात अनेक अत्याधुनिक साधनांचा वापर केला जातो. माहिती-निर्मितीचा प्रचंड वेग, तीमधील विविधता व वैचित्र्य आणि आर्थिक मर्यादा जमेस धरून माहितीची देवाणघेवाण करण्याच्या संदर्भात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर सहकारी योजना कार्यान्वित होऊ लागल्या देशांतील विद्यापीठे, संशोधनसंस्था, औद्योगिक प्रकल्प यांच्यामधून माहितीच्या देवघेवीचे कार्य चालू आहे.
 राष्ट्रीय पातळीवरील Nicnet, Delnet, Calibnet, Indonet, Nassdoc, Insdoc, Nissat,Desidoc, Inis, Agris, आणि Inspec असे माहिती केंद्र आपले ज्ञान देण्याचे कार्य करून राष्ट्र विकासास मदत करतात.




8.  लायब्ररी 2.0 संकल्पना : राष्ट्र विकासाचे गतिमान साधन
माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीवरच राष्ट्र प्रगती करू शकतो.  आज ग्रंथालयाच्या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान आणि त्याच्या आधुनिक साधंनाचा उपयोग केला जात आहे. डॉ. जॅक. एम. म्हणतात की, “संवादात्मक, सामूहिक सहभागातून विविध अंगी अशा इंटरनेट आधारित तंत्रज्ञान याचा ग्रंथालय सेवा व कार्यात वापर करणे म्हणजे लायब्ररी 2.0 संकल्पना होय. ”
लायब्ररी 2.0 या संकल्पनेमाघे वेब 2.0 हे तंत्रज्ञान आहे . टिम ओइरेल्ली यांनी वेब 2.0 ही संकल्पना मांडली. वेब 2.0 हे इंटरनेट आधारित सेवाची प्रगत पिढी असून ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश होतो. आर.एस.एस.फीड, वेबब्लॉग, मेसेजिंग, विकीज, सोशल नेटवर्क, टटिंग, मशअप, फ्लिकर इ. तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. या संकल्पनेचा वापर ग्रंथालयात केल्यास अभ्यासक, संशोधक, आणि वाचकांना हवी ती माहिती अति जलद देता येते. लायब्ररी 2.0 संकल्पनेतून राष्ट्र विकास साध्य करता येतो.
ग्रंथालय आणि माहितीशास्त्र केवळ प्रगत राष्ट्रांमधूनच नव्हे तर, प्रगतिपथावर असलेल्या राष्ट्रांमधूनही स्थिर होत आहे. हे शास्त्र अधिक परिणाम कारक व उपयुक्त करण्याच्या हेतुने निरनिराळी राष्ट्रे प्रयत्नशील आहेत. ग्रंथालयाचे संगनिकीकरन करण्यात येत आहे . डिजिटल ग्रंथालय, आभाशी ग्रंथालय स्थापन केली जात आहेत. आज ग्रंथालयत मॅग्नेटिक टेप, डिस्क, ड्रम, व्हीडिओ डिस्क, मायक्रोफिल्म, मायक्रोफीश, संगणकयंत्र, इ. साधनांचा माहिती साठविण्यासाठी व प्रसारणासाठी उपयोग केला जात आहे.
लायब्ररी 2.0 संकल्पनेचा उपयोगाने ग्रंथालयात विविध सेवा आणि कार्य अति जलद करता येतात आणि त्यातून राष्ट्र विकासाचे चक्र गतिमान होते.   





9.  भारतीय माहिती धोरण    : राष्ट्र विकासाचे नियोजन
ज्ञान युगात आपले राष्ट्र ज्ञानवंचित राहून प्रगती करू शकणार नाही. त्यासाठी ज्ञान निर्मिती आणि ज्ञान संग्रह करून ज्ञानमय राष्ट्र करणे आवश्यक आहे याची शासनाला जाणीव झाल्यामुळे शासनाने माहितीचे नवे धोरण स्वीकारले. भरतात माहितीचे राष्ट्रीय धोरण कसे निर्माण करता येईल आणि माहितीच्या धोरणाची ध्येय- धोरण काय असतील यासाठी प्रा. डी.पी. चटोपपाध्य समितिची  नेमून केली. या समितीने माहितीच्या राष्ट्रीय धोरण या बाबत खालील शिफारशी सांगितल्या आहेत.  
ग्रंथालय आणि माहिती स्त्रोतांचा वापर सर्व कार्यात आवश्यक आहे. निर्णयक्षमतेसाठी सर्व स्तरावर माहितीची उपलब्धता , अचूकता आणि तत्परता याची मदत होते. सुसंब्ध माहिती राष्ट्रीय विकासात गतीमानता आणण्यास कारणीभूत होते. ज्ञानी नागरिक ही राष्ट्राची संपत्ती असून महितीचा योग्य विनियोग नागरिकांच्या विकासासाठी करणे अत्यावश्यक आहे.
माहितीच्या राष्ट्रीय धोरणाचे ध्येय खालील प्रमाणे आहेत.
राष्ट्रीय कार्यात माहितीचे महत्व जाणून ती संघटित करणे.
माहिती वापरण्यासाठी सहज उपलब्ध करून देणे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्राच्या गरजा ओळखून नवीन सेवा सुरू करणे.
सर्व क्षेत्रात आर्थिक बचतीसाठी महितीचा वापर करणे.
ज्ञान सांपदन आणि ज्ञानसंवर्धना मुळे मिळणारे फायदे लोकांना देणे.
मानवी संस्कृतीचा ठेवा लोकांसमोर प्रदर्शित करणे.
अशा माहितीच्या राष्ट्रीय धोरनातून राष्ट्र विकासाचे नियोजन करता येते.
यूनेस्कोने प्रत्येक राष्ट्राची माहिती पद्धती असावी हे धोरण स्वीकारले. राष्ट्रातील माहिती पध्दती नियोजन व व्यवस्थापन या दृष्टीने काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. यामध्ये योजना, राष्ट्रातील लोकांची माहिती विषयक गरज, राष्ट्रीय माहिती पद्धतीची आवश्यकता, ध्येय- राष्ट्रातील सर्व जाळ्याची व्यवस्था , नवीन माहिती तंत्रज्ञान  इ. गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. भारतात राष्ट्रीय माहिती प्रणाली मध्ये निसाट, इन्स्डाक, डेसिडाक आहेत. तर आंतर राष्ट्रीय प्रणाली मध्ये यूनिसिस्ट, इनीस, अग्रीस आणि मेडलर्स इ. माहिती प्रणाली आहेत. भारतीय माहिती धोरनातून राष्ट्र विकासाचे नियोजन करून राष्ट्र विकास साध्य करता येईल.


10. राष्ट्रीय ज्ञान आयोग : राष्ट्र विकासासाठी ज्ञानमय राष्ट्र
राष्ट्रीय प्रगतीला आधार देणे आणि भारत ज्ञानमय करणे हे ध्येय घेऊन 2005 मध्ये राष्ट्रीय ज्ञान आयोगची स्थापना करण्यात आली. एक सशक्त ज्ञान-आधारित समाज निर्माण करून भारताला विकसित राष्ट्र करणे हे या आयोगाचे उद्दिष्ट्ये  आहे. आरोग्य, शिक्षण, शेती, पाणी , ऊर्जा, आणि उद्योग सारख्या क्षेत्रात नव नवीन ज्ञान निर्माण होत असून त्याचा उपयोग आपल्या देशात व्हावा यासाठी राष्ट्रीय ज्ञान आयोग कार्य करते. राष्ट्रीय ज्ञान आयोग च्या शिफारसी नुसार  भारतात राष्ट्रीय आभासी ग्रंथालय स्थापन करण्यात आले.  
भारततील आर्थिक, वैज्ञानिक, प्रौद्योगिकीय , सामाजिक आणि सांस्कृतिक विकाससाठी माहिती तंत्रज्ञानच्या उपयोगस महत्व देवून त्याचा वापर वाढवणे हे राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे ध्येय आहे.

भारताचे राष्ट्रीय आभासी ग्रंथालय

आजच्या युगात संशोधन, शिक्षण आणि विविध क्षेत्रातिल वाचक, संशोधक  डिजिटल माहितीचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. म्हणून ग्रंथालये आपल्याकडील माहिती आणि सेवा डिजिटल  स्वरुपात देत आहेत. डिजिटल माहिती ही एक महत्वपूर्ण ज्ञान परिसंपत्ति म्हणून कार्य करीत आहे. विध्यार्थी, संशोधक , वेज्ञानिक आणि विविध क्षेत्रातील अभ्यासक यांच्या शैक्षिनीक, सामाजिक, आर्थिक, आणि विविध प्रकारच्या माहिती विषयक गरजापूर्ती करण्यासाठी राष्ट्रीय आभासी ग्रंथालय स्थापन केले आहे .

राष्‍ट्रीय ग्रंथालय मिशन

ग्रंथालय आणि माहिती शास्त्रचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय ज्ञान आयोग (एनकेसी) च्या सिफारिशी नुसार संस्कृति मंत्रालय, भारत सरकार तर्फे  दिनांक 4 मे 2012 च्या अधिसूचना सं.18-4/2009 ग्रंथालय च्या माध्‍यमातून एक उच्च स्तरीय समिति अर्थात्, राष्ट्रीय पुस्‍तकालय मिशन ची स्थापना करण्यात आली. राष्‍ट्रीय पुस्‍तकालय मिशन ने लोकांना सेवा देण्यासाठी प्रमुख कार्यक्रम खलील प्रमाणे आहेत.

भारतीय राष्ट्रीय आभासी ग्रंथालय (एनवीएलआई), एनएमएल मॉडल ग्रंथालयची स्थापना, ग्रंथालयाचे मात्रात्मक आणि गुणात्मक सर्वेक्षण, कार्यक्षमता विकास .
भारतीय राष्ट्रीय आभासी ग्रंथालयाचा मुख्य उद्देश्‍य सूचना संबंधी अंकीय संसाधनवर एक वृहत सुविधाजनक डाटाबेस  तयार करणे.एनएमएल मॉडल ग्रंथालय स्‍थापन करून आर्थिक मागासलेल्या जिल्हात लक्ष देऊन तिथे मॉडल ग्रंथालय स्थापन करणे आणि सर्व ग्रंथालयाचे नेटवर्क  स्थापन करणे . भारतातील  ग्रंथालयाचे सर्वेक्षण करून ग्रंथालयाचे मात्रात्मक और गुणात्मक सर्वेक्षण करणे. भारतातील ग्रंथालय क्षेत्रातील कार्य करणार्‍या ग्रंथपाल आणि अन्य कर्मचार्‍याची कार्य क्षमता वाढवणे.
आपण  एका  चौकस आणि नावीन्यपूर्ण-ज्ञान देणार्‍या समाजात जगत आहोत. जागतिक पातळीवर संशोधन, गंभीर विषय आणि विश्लेषणात्मक विचाराचा प्रसार आणि प्रचार वेगाने बदलत असून सामाजिक बदल घडवत आहेत . आपल्याला जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर संशोधन आणि विश्लेषणात्मक विचार, कौशल्य आणि वृत्ती विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्ञान आयोगाने महत्वपूर्ण कार्य करून ज्ञान निर्मित संग्रह आणि प्रसार केला पाहिजे.तरच आपले राष्ट्र ज्ञानमय होऊन प्रगती करू शकेल

11.   डिजिटल भारत : ज्ञानाधिष्टीत सामाजिक आणि अर्थीक क्रांतीची नवी सुरुवात
“डिजिटल भारत ”करण्यासाठी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी यांनी मंजूरी दिली असून त्यासाठी “डिजिटल सशक्त समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्था मध्ये भारताला बदलने : एक कार्यक्रम ” हा उपक्रम सुरू केला आहे.
डिजिटल सशक्त समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्था मध्ये भारताला बदलने हे या उपक्रमाचे उद्देश आहे. 2018 पर्यन्त डिजिटल भारत निर्माण करणे हे ध्येय आहे. त्यासाठी परिवर्तनकारी इलेक्ट्रॉनिक सेवा नागरिकांना देणे हे या उपक्रमाचे कार्य आहे.

प्रत्येक नागरिकाला उपयुक्त ई- सेवा देणे, ग्रामपंचायती मध्ये उच्च गतिचे इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणे, एक सार्वजनिक क्लाउड तयार करने आणि साइबर-स्पेस सुरक्षित सुरक्षित करणे इ . उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे . ऑनलाइन आणि मोबाइल द्वारे सरकारी सेवा उपलब्ध करून देणे, सरकार सेवा डिजिटल करने, यूनिवर्सल डिजिटल साक्षरता करणे, डिजिटल संसाधने सर्वत्र सुलभ उपलब्ध करून देणे, सर्व सरकारी दस्तावेज / प्रमाण पत्र डिजिटल उपलब्ध करून देणे ,भारतातील सर्व भाषामध्ये डिजिटल संसाधने आणि सेवाची उपलब्ध करून देणे इ. सेवा देवून भारत डिजिटल करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतु आहे. शासनाने “गांव तिथे ग्रंथालय “ ही मोहीम राबवून ज्ञानमय राष्ट्र निर्माण करता येऊ शकते. ज्ञानाधिष्टीत सामाजिक आणि आर्थीक क्रांतीची नवी सुरुवात करून राष्ट्राला विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 

2 comments: