महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (MPSP)
http://www.mpsp.maharashtra.gov.in/SITE/Home/Home.aspx
‘सर्व शिक्षा अभियान’ – 2012-13 साली केंद्र सरकारच्या व्यापक आणि एकात्म पथदर्शी विकास योजनेने बाराव्या वर्षात पदार्पण केले. मुलांच्या शिक्षण हक्कांसंदर्भातील मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिनियम (RTE)-2009, मंजूर होणे, हा या प्रक्रियेतील महत्वाचा भाग होय. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम असून राज्यात SSA अर्थात सर्व शिक्षा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा उपक्रम प्रयत्नशील आहे.
प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न वास्तवात आणणे, राज्याचा साक्षरता दर नव्या उंचीवर देणे आणि राज्यासह देशातील जनतेला सक्षम करण्याची ध्येये आम्हाला प्रत्येक सरत्या वर्षाबरोबर गाठता येतील, अशी आशा आहे.










