राज्याचा दहावीचा निकाल 91.46 टक्के
| |
- - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2015 - 01:30 AM IST
| |
मुंबई - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज (सोमवार) जाहीर झाला असून, राज्याचा एकूण 91.46 टक्के निकाल लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 96.54 टक्के निकाल लागला आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल आज दुपारी एक वाजता संकेस्थळांवर (ऑनलाइन) पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना 15 जून रोजी दुपारी तीन वाजता शाळांतून गुणपत्रके मिळतील. 29 जूनपर्यंत उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावयाचे आहेत. यावर्षी परीक्षेसाठी 17 लाख 32 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विशेष म्हणजे, हा निकाल एसएमएसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना मिळेल. बीएसएनल मोबाईलधारकांना 57766 या क्रमांकावर MHSSC< (स्पेस) परीक्षा क्रमांक > याप्रमाणे एसएमएस पाठवून निकाल समजेल. याबरोबर, आयडिया, व्होडाफोन, एअरसेल, रिलायन्स, युनिनॉर कंपन्यांच्या मोबाईलवरुनही MH 10 (स्पेस) परीक्षा क्रमांक असा एसएमएस 58888111 यावर पाठविल्यानंतर निकाल समजेल. एअरटेल मोबाईलवरून निकाल पाहण्यासाठी MH 10 (स्पेस) परीक्षा क्रमांक याप्रमाणे एसएमएस 527011 या क्रमांकावर पाठवावा. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालाबरोबर सर्व विषयांचे गुणही उपलब्ध होतील.
गेल्यावर्षी पेक्षा यंदा निकालात 3.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 90.18 टक्के असून,
उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 92.94 टक्के आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून, कोकण विभागाचा निकाल 96.54 टक्के, तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल 87.46 टक्के लागला आहे. शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 4731 आहे, तर शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या 21 एवढी आहे.
विभागवार आकडेवारी
कोकण: 96.54
कोल्हापूर: 95.12
पुणे: 95.10
मुंबई: 92.90
नाशिक: 92.16
औरंगाबाद: 90.57
नागपूर: 87.01
अमरावती: 86.74
लातूर: 86.38
निकालासाठी ही संकेस्थळे पाहा
0 comments:
Post a Comment