Tuesday, 5 May 2015

edu

ऑनलाइन शॉपिंग हे तरुणांच्या गळय़ातील ताईत आहे, पण अनेकदा ऑनलाइन शॉपिंग करताना आपण एकाच ई-रीटेल संकेतस्थळावर जातो आणि तेथे असलेल्या पर्यायांमध्ये गुंततो. जर आपल्याला दुसऱ्या संकेतस्थळावरील ऑफर्स पाहावयाच्या असतील, तर ती सर्व संकेतस्थळे उघडून त्यावरील माहिती मिळवावी लागते. ही सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक ऑनलाइन कम्युनिटी कार्यरत आहेत. यांच्या माध्यमातून ग्राहकांना एकाच उत्पादनासाठी विविध ई-रीटेल संकेतस्थळांवर किती किमतीत पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. याचबरोबर ऑनलाइन शॉपिंगच्या संदर्भातील चर्चाही येथे रंगतात. पाहूयात अशा प्रकारच्या ऑनलाइन कम्युनिटी.
desidime.com
डेसिडाइम डॉट कॉम हे संकेतस्थळ कोणत्याही वापरकर्त्यांसाठी अगदी मोफत आहे. सामान्य माणसाने ऑनलाइन शॉपिंग करताना अधिक सजगपणे करावे या उद्देशाने हे कम्युनिटी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर अ‍ॅमेझॉल, फ्लिपकार्टसारख्या संकेतस्थळांवरील आपल्याला पाहिजे असलेल्या उत्पादनाच्या किमती आणि त्याची माहिती उपलब्ध होते. तसेच या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण थेट संबंधित संकेतस्थळावरील उत्पादन खरेदीही करू शकतो. म्हणजे ई-रीटेल संकेतस्थळे आणि ग्राहक यांच्यातील उत्तम दुवा म्हणून हे संकेतस्थळ काम करते. याशिवाय वापरकर्त्यांना विविध ऑफर्सबद्दलची माहितीही दिली जाते. तसेच विविध संकेतस्थळांचे कूपन्स खरेदी करून ते आपण कुणालाही भेट म्हणून पाठवू शकतो. या संकेतस्थळावर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांबरोबरच पुस्तके, गेम्स, घराच्या सजावटीचे सामान, बेबी केअरपासून ते खाद्यपदार्थापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे, तर या संकेतस्थळावर आपण मित्र बनवू शकतो. तसेच ऑनलाइन शॉपिंगसंदर्भात या संकेतस्थळावर असलेल्या फोरममध्ये गप्पा आणि अनुभवही शेअर केले जातात. या अनुभवांतून किंवा गप्पा मारून आपण एकमेकांचे सल्लेही घेऊ शकतो.
हे संकेतस्थळ २०११ मध्ये सुरू करण्यात आले. त्या वेळेस ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण आजच्या तुलनेत खूपच कमी होते. तरीही या संकेतस्थळाची संकल्पना सर्वाना आवडली आणि संकेतस्थळावर लोकसहभाग वाढू लागला, असे संकेतस्थळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक मेहुल जोबानपुत्रा यांनी स्पष्ट केले. या संकेतस्थळावर सध्या दोन लाखांहून अधिक नोंदणीकृत सदस्य आहेत. हे सदस्य केवळ शॉपिंग करतात, इतकेच नव्हे तर नवीन ऑनलाइन शॉपर्सना मार्गदर्शनही करतात. याचबरोबर या संकेतस्थळावर तुम्ही जर काही टिप्पणी पोस्ट केली तर तुम्हाला पॉइंट्स मिळतात. हे पॉइंट्स तुम्ही शॉपिंग करताना कूपनच्या रूपात मिळवू शकता, असेही जोबानपुत्रा यांनी स्पष्ट केले. तसेच ई-शॉपिंग संकेतस्थळांवरील अनुभव आणि त्यांच्या विविध ऑफर्सचे मूल्यांकन या संकेतस्थळावरील सदस्य करत असतात. यामुळे नवीन ग्राहकांना चांगल्या प्रकारे ज्ञान मिळू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
carrotfry.com
कॅरटफ्राय डॉट काम या संकेतस्थळावरही अनेक शॉपिंग साइट्सवरील उत्पादने आणि त्यांच्या ऑफर्सची माहिती उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये टॉप डील्स, बेस्ट डील्स असे विविध पर्याय देण्यात आले आहेत. संकेतस्थळावरील नोंदणीकृत सदस्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या शॉपिंगवरून ही बाब ठरवली जाते. या संकेतस्थळावर फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील, मायंत्रा, ई-बे, शॉपक्लूज, इंफिबीम, जबाँगसारख्या संकेतस्थळांवरील उत्पादने आणि ऑफर्स ग्राहकांसाठी खुल्या करून दिल्या जातात. या संकेतस्थळावरही मोबाइल, संगणक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फॅशन, चप्पल्स, पुस्तके, आरोग्य अशा विविध प्रकारांतील उत्पादने उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरून आपण शॉपिंग करत असू, तर एक कूपन कोड दिला जातो. याच्या माध्यमातून तुम्हाला शॉपिंग करावी लागते. याचबरोबर संकेतस्थळाचे मोठय़ा ब्रँडशी सहकार्य असून त्यांची उत्पादनेही थेट येथून संबंधित ब्रँडच्या संकेतस्थळावर जाऊन घेता येऊ शकतात. या संकेतस्थळावरील फोरमवर जर तुम्ही काही माहिती शेअर केली आणि ती योग्य असेल व त्यास इतर सदस्यांची पसंती मिळाली तर तुम्हाला मोठय़ा ब्रँड्सची अनेक उत्पादने भरघोस सवलतीत उपलब्ध होऊ शकतील. या संकेतस्थळावरील डील या विभागात ग्राहकांना अधिकृत आणि विश्वासार्ह सवलतींची माहिती मिळते. या संकेतस्थळात काम करणारा एक गट चोवीस तास विविध डील्सची माहिती अपडेट करत असतो. या संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्ही आणखी पैसे वाचवू शकता, असा दावाही कंपनीने संकेतस्थळावर केला आहे.
dealschamp.in
या संकेतस्थळावरही इतर संकेतस्थळांप्रमाणेच शॉपिंग साइट्सवरील ऑफर्स आणि उत्पादनांची माहिती मिळते. याचबरोबर संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन शॉपिंगवर चर्चा घडवून आणणाऱ्या विविध फोरम्समध्ये सहभागीही होता येते. यामुळे ग्राहक अधिक सज्ञान होऊन शॉपिंग करू शकतो. यामध्ये तुम्ही कूपन्स खरेदीही करू शकता. तसेच गेम्स झोनमधील गेम्स खेळून पॉइंट्स कमावू शकता. या पाँइट्सचा वापर तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये करू शकता.
ऑनलाइन शॉपिंग कम्युनिटी संकेतस्थळे
ई-व्यवहार संकेतस्थळ आणि ग्राहक यांच्यातील दुवा असला तरी तो ग्राहकांनी ग्राहकांसाठी तयार केलेला आहे. यामुळे यामध्ये ग्राहक एकमेकांना योग्य मार्गदर्शन करून फसवणुकीचे प्रमाण कमी करू शकतात. याचबरोबर कोणत्या वेळी कोणती गोष्ट खरेदी केल्यास ते अधिक स्वस्त पडेल याचा तपशीलही या माध्यमातून मिळतो. यामुळे ही संकेतस्थळे मार्गदर्शक संकेतस्थळ म्हणून ओळखली जातात. याचबरोबर या संकेतस्थळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणाऱ्यांनाही आपण शॉपिंग सल्लागार असल्यासारखे भासते. अशा प्रकारची आणखी काही संकेतस्थळे.
ldigitallyhot.com
ldesireon.com
- नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com

Related Posts:

  • Librarians prevalent in use of social media Librarians prevalent in use of social media Social media is forming an increasingly central part of how we all communicate. Its online communities carry a strong and influential voice, and there is much to be gained from e… Read More
  • अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षीच्या थेट प्रवेशासाठी आता सीईटी! अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षीच्या थेट प्रवेशासाठी आता सीईटी! संदीप आचार्य, मुंबई  Dainik Loksatta Published: Sunday, February 22, 2015 अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकी पदवीच्या दुसऱ्या वर्षांला … Read More
  • वाचनकौशल्य जोपासा  गायत्री गाडगीळ  gayatri.gadgil@gmail.com वाचन ही नुसती आवड नसून कामाच्या ठिकाणी अतिशय आवश्यक असे कौशल्य आहे. कार्यक्षम वाचक दिवसभरात समोर येणारी अनेक ई-मेल्स, अहवाल व पत्रव्यवहार पटकन समज… Read More
  • उच्चशिक्षण सुधारणांतील गुंते, चकवे.. उच्चशिक्षण सुधारणांतील गुंते, चकवे.. -          नीरज हातेकर, राजन पडवळ विद्यापीठीय किंवा महाविद्यालयीन शिक्षणात 'क्रेडिट बेस्ड' सहामाही- सेमिस्टर परीक्षा पद्धती कशी का हो… Read More
  • उत्तम अभिव्यक्तीसाठी उत्तम अभिव्यक्तीसाठी..*> चांगली अभिव्यक्ती हा विषय सर्वस्पर्शी आहे. कुठलेही काम करताना त्याच्या> मांडणीविषयी सविस्तर विचार करायला हवा. आपल्या शिक्षण पद्धतीत केवळ घोकंपट्टी> करून चांगले मार्क मिळवता येतात, हे विद्यार… Read More

0 comments:

Post a Comment