Tuesday 9 June 2015

विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना तज्ज्ञांची उत्तरे...

विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना तज्ज्ञांची उत्तरे...
- -
मंगळवार, 9 जून 2015 - 03:19 PM IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सहाय्यक सचिव अनिल गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नाला दिलेली उत्तरे -

माझ्या मुलाला दहावीमध्ये 58.2 टक्के आहेत. त्याला स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदविका करण्यात रस आहे. तसेच त्यानंतर पदवीही करायची त्याची इच्छा आहे. त्याला गणितामध्ये सर्वाधिक 70 गुण आहेत. कृपया मार्गदर्शन करावे. 
- योगेश नायडू
उत्तर - योगेश आपण अभियांत्रिकी पदविकेसाठी प्रवेश घेऊ शकता. त्यानंतर पदविकेत उत्तम गुण मिळाल्यास पुढे पदवी परीक्षेच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेता येऊ शकेल. पदविकेची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली आहे.

माझ्या मुलाला दहावीमध्ये 500 पैकी 412 गुण (82.40%) आहेत. मात्र विज्ञानात त्याला केवळ 52 गुण आहेत. त्याला कोणत्या शाखेला पाठवू? त्याला विज्ञानामध्ये रस आहे. 

- मोहन भागवत
उत्तर - विज्ञान विषयात कमी गुण असतील आणि त्यात रस असेल तर विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यास हरकत नाही. प्रथम विज्ञान विषयाच्या गुणांची गुणपत्रिका मिळाल्यानंतर गुण पडताळणी करावी किंवा मंडळाकडे छायांकित प्रतीसाठी अर्ज केल्यास विज्ञान विषयाची उत्तरपत्रिकाही मिळू शकते. त्यावरून मिळालेले गुण योग्य आहेत किंवा कसे हे पाहता येईल. व त्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ शकता.

मला दहावीमध्ये 88.60 टक्के आहेत. मला विज्ञान आवडत असल्याने विमान तयार करण्याच्या क्षेत्रात रस आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 
- प्रथमेश कुदळे
उत्तर - विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, गणित उत्तीर्ण झाल्यास विमानाशी संबंधित असलेल्या शाखांमध्ये प्रवेश मिळू शकतो.

मला दहावीला 75.6% टक्के आहेत. मी विज्ञान आणि इंग्रजीमध्ये कच्चा आहे. मला विज्ञान किंवा वाणिज्य शाखेमध्ये रस नाही. मला बाईक्‍स, कार्स वगैरे क्षेत्रात रस आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 
- रामदास बाणखेले
उत्तर - बाईक्‍स, कार्क्‍स या क्षेत्रात आवड असल्यास विज्ञान शाखेत जाणे अपरिहार्य आहे. बारावीनंतर ऍटोमोबाईल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून पुढे या क्षेत्रात प्रवेश घेता येऊ शकेल.

सर मला दहावीला 58 टक्के आहेत. मला इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रात रस आहे. मला कमी गुण असल्याने भीती वाटत आहे. कृपया मार्गदर्शन व्हावे. 
- सोनाली सुतार
उत्तर - आपल्याला मिळालेले गुण पाहता गणित व विज्ञान या विषयात मिळालेल्या गुणांचा विचार करून पुढील निर्णय घ्यावा. इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रात जाण्यासाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेणे आवश्‍यक आहे. गुण कमी मिळाले असले तरीसुद्धा प्रयत्नपूर्वक परिश्रम केल्यास यश मिळू शकते.

I have got 93.4% in SSC board 10th, i want to try for pure science(KVPY) in 11 & 12th, And if not.... engg...(JEE)/(CET), so should I take biology in 11th /12th(PCMB), And how many times can I appear for KVPY..., And if not Biology ....,Which sub can be easier for bifocal(PCM) 
- निरज सरोदे
उत्तर - केव्हीपीवायसाठी व इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घ्यावयाचे निश्‍चित असल्यास जीवशास्त्र घेण्याची आवश्‍यकता नाही. तसेच बायफोकलमधील आवडीचे विषय निवडून विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यास हरकत नाही. केव्हीपीवायच्या अधिक माहितीसाठी संस्थेच्या वेबसाईटला भेट द्यावी.

माझ्या एका नातेवाईकाला दहावीमध्ये 88 टक्के आहेत. त्याला कृषी क्षेत्रामध्ये काही संधी आहे का? योग्य करिअरसाठी मार्गदर्शन करावे. 
- रोशन सुर्वे
उत्तर - विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन कृषी विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या पदवीसाठी प्रवेश घेऊ शकता. कृषी शाखेत प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखेत जीवशास्त्र विषय घेणे अनिवार्य आहे.

मला दहावीमध्ये 76 टक्के आहेत. मी अनुसूचित जमाती या प्रवर्गातील आहे. मला पुढे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांमध्ये रस आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 
- प्रांजल बेंडकोळी
उत्तर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी किमान पात्रता कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने शाखा निवडावी.

मला दहावीमध्ये 48 टक्के आहेत. पुढे कोणते शिक्षण माझ्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. मी कोणत्या पदविका किंवा पदवीसाठी प्रवेश घेऊ शकतो. 
- नामदेव राठोड
उत्तर - दहावीत मिळालेल्या गुणांचा विचार करता कला शाखा तसेच आयटीआयशी संबंधित कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकता.

मला दहावीमध्ये 44 टक्के आहेत. मी माझे उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्यासाठी अर्ज केला आहे. कृपया कोणते क्षेत्र निवडावे, मार्गदर्शन करावे 
- श्रुती संघवी
उत्तर - प्रथम मंडळाकडून उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करावा. त्यानंतर मिळालेल्या गुणांचा विचार करून आवडीची शाखा निवडण्यास हरकत नाही. आपण वाणिज्य किंवा कला शाखेला तसेच दहावीच्या गुणांवर आधारित आयटीआय कोर्सेससाठी प्रवेश घेऊ शकता.

I have passed 10th grade through ICSE board with 88.6%. I am interested in both Biological science and Computer science. Can I choose a career in computers if my interest is inclined towards Computer Science as I study for the two years? OR Is there any career with ample scope where I can use the knowledge of Biology as well as Computer Science? Your reply would be appreciated. 
- Rajiv Sangle
उत्तर - आपण दिलेले विषय घेऊन विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ शकता. परंतु, कम्युटर सायन्समध्ये बारावीनंतर प्रवेश घ्यावयाचा असल्यास गणित विषय घेणे आवश्‍यक आहे.

माझ्या मुलाला दहावीमध्ये 67 टक्के आहेत. त्याला विज्ञानशाखेत जाऊन पुढे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये (सिव्हिल इंजिनिअरिंग) जाण्याची इच्छा आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 
- सुरेखा झेंडे
उत्तर - दहावीनंतर स्थापत्य अभियांत्रिकीची पदविकेसाठी प्रवेश घेता येऊ शकतो किंवा विज्ञान शाखा घेऊन बारावीनंतरही स्थापत्य अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेता येईल.

मला सीबीएसई बोर्डात 65 टक्के आहेत. मी कोणत्या पदविकेला प्रवेश घ्यावा? 
-शिवांजली
उत्तर - आपण आपली आवड लक्षात घेऊन योग्य त्या कोणत्याही शाखेच्या पदविकेसाठी प्रवेश घेऊ शकता.

मला दहावीला 66 टक्के आहेत. मला वाणिज्य शाखेत रस आहे. तसेच मला वाडिया किंवा दस्तूर महाविद्यालयात प्रवेश हवा आहे. 
- मयूर
उत्तर - अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने चालते. त्यानुसार वाणिज्य शाखेसाठी प्राधान्यक्रम देऊन त्यानुसार मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकता. प्रवेश कुठे मिळाला हे महत्वाचे नसून तुम्ही किती अभ्यास करता यावर तुमचे यश अवलंबून असते.

मला दहावीत 68 टक्के आहेत. मला एनडीएमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 
- कातिर्क माखिजा
उत्तर - विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन एनडीएमार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होऊन एनडीएमध्ये प्रवेश मिळू शकतो. एनडीमधील प्रवेश हा केवळ मुलांसाठी दिला जातो.

माझे डी.एड.पूर्ण झाले असून मी सीईटीमध्ये यशस्वी होऊ शकलो नाही. यापुढे मला कृषी क्षेत्रात रस आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 
-शशी
उत्तर - आपल्या आवडीप्रमाणे आपण बारावी विज्ञान उत्तीर्ण करून डी.टी.एड.उत्तीर्ण झाला असाल तर बारावीच्या गुणांच्या आधारे कृषी पदविका व कृषी पदवीसाठी प्रवेश घेऊन आपल्या आवडीचे क्षेत्र निवडू शकता.

Dear Sir,
I am Chinmay I had secured 92 % marks in SSC Exams 2015, I am having interest in Science and aim is to prepare for IIT Advance after my 12th, So it is my request to you to suggest me a college according to my marks which will also guide me for JEE Advance, I am from open Category. 

- Chinmay Pabshettiwar
उत्तर - अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेद्वारे व आपल्या प्राधान्यक्रमानुसार विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढील पात्रतेसाठी अकरावीपासून प्रयत्न करावा व मार्गदर्शन घ्यावे. आपल्या इच्छेप्रमाणे यश नक्की मिळेल.

मला दहावीमध्ये 69 टक्के आहेत. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमामध्ये झाले आहे. पुढील करिअरसाठी कृपया मार्गदर्शन करावे. 
- सुहास घोलप
उत्तर - विद्यार्थ्याचे विषयनिहाय मिळालेले गुण व त्याची आवड विचारात घेऊन अकरावीसाठीची शाखा निवडावी. जेणेकरून पुढे आवडीप्रमाणे करीअर निवडता येईल.

0 comments:

Post a Comment