Monday 1 December 2014

Published: Monday, November 24, 2014
careermantra1मला सरकारी क्षेत्रांमध्ये संगणक विज्ञान-अभियांत्रिकी विषयात करिअर करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?
    - संदीप चित्तकवार
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत तसेच शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये आपल्याला या विषयात प्राध्यापकी करता येईल. यासाठी एमपीएससीमार्फत परीक्षा घेतली जाते. आवश्यकतेनुसार महाराष्ट्र वीज मंडळाला या विषयातील तज्ज्ञांची गरज भासते. त्या वेळेस पदभरती केली जाते. नॅशनल इन्फम्रेटिक्स सेंटरमार्फत शासनाच्या ई-गव्हर्नन्सच्या यंत्रणेचे संनियंत्रण केले जाते. या सेंटरसाठी संगणकतज्ज्ञांची गरज भासते. केंद्रीय पातळीवरून या तज्ज्ञांची निवड केली जाते. याशिवाय अनेक ई-गव्हर्नन्स सेवा काही आघाडीच्या कंपन्यांकडून आऊटसोìसग केल्या जातात. त्यांना संगणकतज्ज्ञांची गरज भासते. याविषयीची माहिती वेळोवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधून प्रकाशित होत असते. त्याकडे लक्ष ठेवावे.
मी अकरावी कला शाखेत शिकत आहे. मला नाटय़ क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे..
- ऋत्विक व्यास
नाटय़ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवावर्गाला पदवीनंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेत अभ्यासक्रम शिकता येईल. ही स्वायत्त संस्था असून या संस्थेला केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे अर्थसाहाय्य लाभले आहे. या संस्थेच्या वतीने तीन वर्षे कालावधीचा डिप्लोमा कोर्स इन ड्रामाटिक्स आर्ट हा अभ्यासक्रम चालवला जातो. हा अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचा आणि पूर्णकालीन आहे. या अभ्यासक्रमाद्वारे अभिनय, डिझाइन आणि रंगमंचाशी निगडित इतर विषयांची सर्वागीण माहिती उपलब्ध करून दिली जाते. याशिवाय पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर विद्यापीठांमध्ये रंगभूमी व ललित कलेचे शिक्षण-प्रशिक्षण देणारे पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सद्धांतिक पाया पक्का होतो. त्याचा फायदा नाटय़ क्षेत्रात करिअर करताना होतो. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पॅशन हवी. प्रचंड परिश्रम करण्याची तयारी हवी. हे क्षेत्र स्पर्धात्मक असून संधी मिळण्यासाठी बरीच वाट बघावी लागू शकते. त्यामुळे मानसिक कणखरपणा अत्यंत आवश्यक ठरतो. अपयशामुळे न डगमगता सातत्य राखणे आवश्यक असते. उत्तम वाचन, आवाजावरची मेहनत, उत्तमोत्तम कलाकृतींचा आस्वाद व प्रत्यक्ष काम आदी बाबीही महत्त्वपूर्ण ठरतात.
मला बायोटेकमध्ये उच्च शिक्षण घ्यायचे आहे. संस्थांबद्दल माहिती द्या.
- मुग्धा पाटील
* इन्स्टिटय़ूट ऑफ बायोइन्फम्रेटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड बायोटेक्नालॉजी- एमएस्सी इन बायोइन्फम्रेटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड बायोटेक्नॉलॉजी. अर्हता- बायोटेक्नॉलॉजी विषयातील बीएस्सी/ बीटेक- बायोटेक्नॉलॉजी/ एमबीबीएस/ बीडीएस/ बीफार्म.
पत्ता- बंगलोर बायोटेक पार्क, इलेक्ट्रॉनिक्स सिटी, फेज वन, बंगळुरू-५६०१०० वेबसाइट-www.ibab.ac.in
ईमेल-info@ibab.ac.in,, msc2014@ibab.ac.in
* पुणे विद्यापीठ-  बायोइन्फम्रेटिक्स सेंटर - अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन बायोइन्फम्रेटिक्स, मास्टर ऑफ सायन्स- बायोइन्फम्रेटिक्स. पत्ता- द डायरेक्टर, बायोइन्फम्रेटिक्स सेंटर, युनिव्हर्सटिी ऑफ पुणे- ४११००७,
वेबसाइट-unipunepgadmissions.com
ईमेल- director@bioinfo.ac.in
* दिल्ली विद्यापीठ- फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड सायन्स- मास्टर ऑफ सायन्स इन प्लान्ट मॉलेक्युलर बायोलॉजी अ‍ॅण्ड बायोटेक्नॉलॉजी.
पत्ता- युनिव्हर्सटिी ऑफ दिल्ली, युनिव्हर्सटिी रोड, न्यू दिल्ली- १००००७.
वेबसाइट- www.du.ac.in
* एएमईटी- मास्टर ऑफ सायन्स इन मरिन बायोटेक्नॉलॉजी.
पत्ता- एएमईटी युनिव्हर्सटिी, १३५, ईस्ट कोस्ट, कांथूर, चेन्नई- ६०३११२.
ईमेल-office@ ametuniv.ac.in
वेबसाइट- www.ametuniv.ac.in
* बायोइन्फम्रेटिक्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया-  बॅचलर ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी आणि मास्टर ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी.
पत्ता- बायाइन्फम्रेटिक्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, सी-५६ए/२८, सेक्टर-६२, नॉयडा-२०१३०१. उत्तर प्रदेश.
वेबसाइट : www.bii.in
ईमेल :  info@bioinformaticscenre.org
* त्याचप्रमाणे विल्सन कॉलेज- मुंबई, फग्र्युसन कॉलेज- पुणे, विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- पुणे, रामनारायण रुईया महाविद्यालय- मुंबई, शिवाजी कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी- अमरावती या ठिकाणी हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
* बीई/बीटेक इन बायोटेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम पुढील ठिकाणी उपलब्ध आहे-
प्रियदर्शनी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअिरग- नागपूर, तात्यासाहेब कोरे इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी- वारणानगर, कोल्हापूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनीअिरग- कोल्हापूर, जवाहरलाल नेहरू इंजिनीअिरग कॉलेज- औरंगाबाद, कॉलेज ऑफ इंजिनीअिरग- जळगाव, एसआयएस, ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी- नवी मुंबई, थडोमल शहाणी कॉलेज ऑफ इंजिनीअिरग- मुंबई, एमजीएम कॉलेज ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, कामोठे, नवी मुंबई.
विविध विद्यापीठांतील मायक्रोबायॉलॉजी-एमएस्सी अभ्यासक्रमांमध्ये फरक असतो का?
                  - कीर्ती वर्तक
देशातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रदेशात आपल्या ज्ञानाचा उपयोग सक्षमतेने करता यावा ही बाब ध्यानात ठेवूनच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम हे साधारणत: एकसमान असतात. त्यामुळे एखाद्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम श्रेष्ठ दर्जाचा आणि दुसऱ्या विद्यापीठाचा कनिष्ठ दर्जाचा असे म्हणता येत नाही. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकविणाऱ्या प्राध्यापकांची गुणवत्ता साधारणत: समान पातळीवरची असते. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला कोणत्या ठिकाणी जाऊन शिकणे परवडू शकते हेसुद्धा बघावे. बीएस्सीमध्ये आपण मायक्रोबायॉलॉजी या विषयासोबत इतर दोन विषय घेतले असतील तर त्याही विषयांमध्ये आपल्याला एमएस्सी करता येऊ शकते.

मी बारावी विज्ञान शाखेत शिकत असून गणित विषयातील करिअर संधींची माहिती हवी आहे.
    - जयेश वानखेडे
आपण अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकता. गणित विषयात बीएस्सी आणि त्यानंतर एमएस्सी करू शकता. इंडियन स्टॅटिस्टिकल संस्थेची प्रवेश परीक्षा देऊन बीएस्सी इन स्टॅट किंवा बीएस्सी इन मॅथ्स हे अभ्याक्रम करू शकता. या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानंतर याच संस्थेतून एमएस्सी करू शकता. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. आपण नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी एक्झामिनेशन तसेच स्पेशल क्लास रेल्वे अ‍ॅप्रेंटिस ही परीक्षा देऊ शकता.
चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटय़ूटद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेद्वारे आपण संस्थेच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवू शकता. गणित विषयातील शिक्षण आणि संशोधनासाठी स्थापन करण्यात आलेली ही महत्त्वाची संस्था होय. या संस्थेत बीएस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्स, बीएस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड फिजिक्स हे दोन इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. बारावीमध्ये गणितासह विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. याच संस्थेत एमएस्सी इन मॅथेमॅटिक्स,  एमएस्सी इन अ‍ॅप्लिकेशन ऑफ मॅथेमॅटिक्स, पीएच.डी. इन मॅथेमॅटिक्स हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मार्च २०१५ मध्ये या संस्थेची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. बीएस्सीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा चार हजार रुपये, एमएस्सीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, पीएच.डी.साठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा १६ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. पत्ता- एच वन, सिपकॉट आयटी पार्क, सिरुसेरी, केलाम्बक्कम. तामीळनाडू. ईमेल- admissions@cmi.ac.in
अध्यापन क्षेत्रात करिअर करायचे असल्यास रिजनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन, म्हैसूर या संस्थेत एमएस्सी बीएड इन (मॅथेमॅटिक्स) या सहा वर्षे कालावधीच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो. पत्ता- मानसगंगोत्री, म्हैसूर- ५७६००३.
वेबसाइट - www.riemysore.ac.in
ईमेल- riemysore@reddiffmail.com
मी अभियांत्रिकी- आयटीच्या शेवटच्या वर्षांला शिकत आहे. मला फ्रीलान्स सदर-लेखनात करिअर करायचे आहे.
    - अनिकेत भोसले
आपल्याला इंग्रजी किंवा मराठी किंवा या दोन्ही भाषांमध्ये सदर-लेखन करायचे आहे. दोन्ही भाषांमध्ये सदर लिहिण्यासाठी संबंधित भाषेवर प्रभुत्व असणे ही सर्वात महत्त्वाची अर्हता ठरते. त्याविषयी तुमची स्वत:ची खात्री असेल तर उत्तमच. शिवाय ज्या कोणत्या विषयावर सदर लिहायचे आहे, तेसुद्धा आधी निश्चित करावे लागेल. कारण एकदा विषय निश्चित झाला की मग त्यावरचे अधिकाधिक वाचनसंदर्भ मिळवणे, तज्ज्ञांशी चर्चा करणे अशा बाबी कराव्या लागतात. सदर-लेखनासाठी आपल्याला भाषा शैली हवी. हे लेखन वाचनीय, माहितीपूर्ण, अचूक, विशिष्ट शब्दमर्यादा पाळणारे असे हवे. सदर-लेखनाचे विशिष्ट तंत्र आहे. इतर मान्यवरांचे सदर-लेखन अभ्यासूनही हे तंत्र जाणून घेता येते. सिम्बॉयसिस विद्यापीठाने 'क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश' हा दूरशिक्षण पद्धतीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानेसुद्धा असा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हे अभ्यासक्रमही आपल्याला करता येऊ शकतील.
मराठी भाषेमध्ये सदर-लेखनाचे करिअर करणे सध्या तरी अवघड दिसते. इंग्रजीमध्ये असे करिअर करता येऊ शकेल, मात्र त्यासाठी काही काळ उमेदवारी करावी लागू शकते. लेखनातील नावीन्य, रंजकता लक्षात घेऊन इंग्रजी नियतकालिके अथवा वृत्तपत्रे लिहिण्याची संधी देऊ शकतात. मात्र, हे सातत्यपूर्ण परिश्रमाचे क्षेत्र आहे, ही बाब लक्षात ठेवावी.
मी सध्या मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मी कोणती स्पर्धा परीक्षा देऊ शकतो? या क्षेत्रातील करिअर संधी कोणत्या?
    - महेश लोंढे
आपण पुढीलप्रमाणे स्पर्धा परीक्षा देऊ शकता-
* GATE - ही परीक्षा देऊन आयआयटी किंवा एनआयटीसारख्या चांगल्या संस्थेत एमई वा एमटेकला प्रवेश मिळवू शकता. सार्वजनिक क्षेत्रातील विविध उद्योगांमध्ये नियुक्तीसाठी आता GATE  मधील गुण विचारात घेतले जातात. एमटेक केल्यानंतर त्यापुढे आपण संशोधन अभ्यासक्रम करू शकता. त्याद्वारे आपल्याला उच्च श्रेणीच्या करिअरच्या संधी संशोधन प्रकल्प उद्योगांमध्ये मिळू शकतात. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अध्यापनाची संधी मिळू शकते.
* संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा देऊन आपल्याला केंद्र शासनाच्या वरिष्ठ शासकीय पदांवर काम करायची संधी मिळू शकते.
* राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी राज्य सेवा परीक्षा देऊन आपण महाराष्ट्र शासनातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, विक्रीकर अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांसारख्या पदांवर काम करायची संधी मिळू शकते.
* इंडियन इंजिनीअिरग सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन ही परीक्षा देऊन केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध विभागांच्या अभियांत्रिकी आस्थापनांवर वरिष्ठ पद मिळू शकते.
* लष्करातील तीनही दलांना अभियंत्याची गरज भासते. शॉर्ट सíव्हस कमिशनद्वारे अशी भरती दरवर्षी केली जाते. यासंबंधीच्या जाहिराती सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमधून प्रकाशित होतात.
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेमार्फत घेतली जाणारी 'कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट' देऊन आपल्याला दर्जेदार नामवंत बिझनेस स्कूलमध्ये एमबीएसाठी प्रवेश मिळू शकतो. सी-मॅट किंवा सीईटी या परीक्षेद्वारेही आपल्याला महाराष्ट्रातील व देशातील व्यवस्थापन अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.
मी एमएस्सी गणित या विषयातील शेवटच्या वर्षांचे शिक्षण घेत आहे. मला अध्यापन वगळता क्रिएटिव्हिटीला वाव असणारे करिअर करायचे आहे.
- श्रवण कुलकर्णी
क्रिएटिव्हिटीची अनेक क्षेत्रे आहेत- उदा. अ‍ॅनिमेशन, ग्राफिक्स, इंटिरिअर डिझायिनग, अभिनय, दिग्दर्शन, लेखन इत्यादी. आपल्याला नेमकी आवड कशात आहे, हे एकदा स्पष्ट झाले, की यापकी कोणत्याही क्षेत्रात करिअर करता येऊ शकते. मात्र त्यासाठी आपल्याला मनापासून रस हवा. परिश्रम करण्याची तयारी हवी.
माझ्या मुलाने मेकॅट्रॉनिक्समध्ये पदविका घेतली आहे. या क्षेत्रात पदवीनंतर कोणत्या संधी आहेत?
    - संजय सावंत
मेकॅट्रॉनिक्स या विषयात पदविका किंवा पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, आर्टििफशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, हेल्थ केअर सेक्टर, प्रॉडक्ट डिझाइन आणि निर्मिती या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी मिळू शकतात.
पदविकाधारकांना पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स, बीई इन मेकॅट्रॉनिक्स, बीटेक इन मेकॅट्रॉनिक्स, एमई इन मेकॅट्रॉनिक्स, एमटेक इन मेकॅट्रॉनिक्स हे अभ्यासक्रम करता येतात. मेन्टेनन्स इंजिनीअर किंवा ऑटो आणि निर्मिती उद्योगात इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअर म्हणून करिअरचा प्रारंभ करता येतो. घरगुती उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रातही पदविकाधारकांना प्राधान्याने संधी मिळू शकते.
पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारक वर नमूद केलेल्या क्षेत्रांशिवाय संगणकातील माहितीची साठवणूक (स्टोअरेज), तसेच संगणकीय माहितीचे प्रक्रियातज्ज्ञ म्हणून करिअर करू शकतात. शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या रोबोटिक उपकरणांच्या निर्मिती उद्योगातही संधी मिळू शकते. डिझाइन इंजिनीअर, प्रॉडक्ट डेव्हलमेंट इंजिनीअर म्हणूनही संधी मिळू शकते.
एमई किंवा एमटेक केलेल्या विद्यार्थ्यांची या क्षेत्रांशिवाय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकपदी नेमणूक होऊ  शकते. जड (हेवी) अभियांत्रिकी, बायोमेडिकल सिस्टीम्स, व्हेहिकल सिस्टीम्स या क्षेत्रातही संधी मिळू शकते. इस्रो, डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) अशांसारख्या संस्थांमध्ये संशोधन करण्याचीही संधी उपलब्ध होऊ शकते.       
(आपले करिअरविषयीचे प्रश्न career.vruttant@express.com  या पत्त्यावर पाठवा.)  
मी बीएस्सी स्टॅटिस्टिक्स करत आहे. मला नंतर  यासंबंधीच्या संशोधन क्षेत्रात करिअर करायचे आहे.
    - वैभव गाडेकर
इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूटमार्फत संशोधनात्मक अभ्यासक्रम चालवले जातात. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती 'ज्युनिअर रिसर्च फेलोशिप' या नावाने ओळखली जाते. ही फेलोशिप पुढील विषयांमध्ये दिली जाते- स्टॅटिस्टिक्स, मॅथेमॅटिक्स- क्वॉलिटी, रिलॅअबिलिटी अ‍ॅण्ड ऑपरेशन रिसर्च, कॉम्प्युटर सायन्स, फिजिक्स आणि अ‍ॅप्लाइड मॅथेमॅटिक्स, अ‍ॅग्रिकल्चर आणि इकॉलॉजी. ज्या विद्यार्थ्यांनी एमटेक किंवा एमई या पदवी प्राप्त केली असेल, त्यांना दरमहा १८ हजार रुपये फेलोशिप आणि इतर अर्हताप्राप्त विद्यार्थ्यांना दरमहा १६ हजार रुपये फेलोशिप दिली जाते. स्टॅटिस्टिक्स, मॅथेमॅटिक्स, कॉम्प्युटर सायन्स, क्वान्टिटेटिव्ह इकॉनॉमिक्स, क्वॉलिटी रिअ‍ॅलिबिलिटी आणि ऑपरेशन रिसर्च या विषयांमध्ये उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना अतिरिक्त दोन हजार रुपयांची फेलोशिप प्रदान केली जाते. फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाते.
पत्ता : डीन ऑफ स्टडीज, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट, २०३, बॅरकपोर ट्रंक रोड कोलकाता ७००१०८ या पत्त्यावर पाठवा. हा अर्ज www.isical.ac.in/-deanweb या संकेतस्थळावरसुद्धा उपलब्ध केला जातो. ईमेल- isiadmission@iscal.ac.in  

0 comments:

Post a Comment